Cooch Behar Trophy: गोव्याची सावध, दमदार फलंदाजी; सांगे जीसीए मैदानावर सामन्याला सुरवात

Cooch Behar Trophy: विदर्भविरुद्ध वीर यादवचे अर्धशतक
Veer & Jeevan
Veer & JeevanDainik Gomantak
Published on
Updated on

Cooch Behar Trophy: कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मागील लढतीत गोव्याने पंजाबविरुद्ध अतिशय खराब फलंदाजी केली. चुकांतून बोध करताना त्यांनी शुक्रवारी विदर्भविरुद्धच्या सामन्यात सावध व दमदार फलंदाजी केली.

सांगे येथील जीसीए मैदानावर अ गटातील चार दिवसीय सामन्याला शुक्रवारपासून सुरवात झाली.

वीर यादव (69) याचे अर्धशतक, तसेच शंतनू नेवगी (35), दिशांक मिस्कीन (नाबाद 32) व जीवन चित्तेम (नाबाद 46) यांच्या चमकदार फलंदाजीमुळे गोव्याने पहिल्या डावात दिवसअखेर 4 बाद 208 धावा केल्या.

Veer & Jeevan
Anjuna Vagator Beach: हणजूण वागतोर बीचवर आतषबाजीच्या फटाक्यांमुळे आग; सुदैवाने जीवित हानी टळली

गोव्याला वीर व शंतनू यांनी शानदार शतकी भागीदारी केली. १०३ धावसंख्येवर गोव्याने पहिला गडी गमावला. शंतनू जम बसवू पाहत असताना पुन्हा एकदा बाद झाला.

त्यानंतर वीर याची पुन्हा एकदा अपेक्षा उंचावल्यानंतर बाद होण्याची सवय उफाळून आली, तर यश कसवणकर याला भोपळाही फोडता आला नाही. चांगल्या सुरवातीनंतर १४ धावांत ३ विकेट गमावल्यामुळे गोव्याची ३ बाद ११७ अशी घसरगुंडी उडाली.

निसर्ग नागवेकर (१९) जास्त वेळ टिकला नाही. त्यानंतर मात्र दिशांक व जीवन यांनी समजूतदारपणे संयमी फलंदाजी करत गोव्याचे आणखी नुकसान टाळले व द्विशतकी धावसंख्या गाठून दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ९० षटकांत ४ बाद २०८ (वीर यादव ६९, शंतनू नेवगी ३५, निसर्ग नागवेकर १९, यश कसवणकर ०, दिशांक मिस्कीन नाबाद ३२, जीवन चित्तेम नाबाद ४६, प्रथम महेश्वरी ५०-२, देवांश ठक्कर ५५-२).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com