Cooch Behar Trophy: 46 चौकार, 3 षटकार अन् 404 धावा...! मुंबईविरुद्ध मॅरेथॉन खेळी करत प्रखरने घडवला इतिहास

Prakhar Chaturvedi: मुंबईविरुद्ध कुच बिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रखर चतुर्वेदीने 404 धावांची खेळी करत इतिहास रचला आहे.
Prakhar Chaturvedi
Prakhar ChaturvediX/BCCIDomestic

Karnataka's Prakhar Chaturvedi becomes first player to score 400 in Cooch Behar Trophy Final:

भारतात सध्या देशांतर्गत स्पर्धा सुरु आहेत. कुच बिहार ट्रॉफी या १९ वर्षांखालील प्रथम श्रेणी स्पर्धेचा अंतिम सामना अनिर्णित राहिला. हा सामना मुंबई आणि कर्नाटक यांच्यातील १९ वर्षांखालील संघात केएससीए नवुले स्टेडियमवर झाला. या सामन्यात कर्नाटकला पहिल्या डावातील आघाडीमुळे विजेता घोषित करण्यात आले.

दरम्यान, याच सामन्यात एक मोठा इतिहास रचला गेला. या सामन्यात कर्नाटकचा सलामीवीर फलंदाज प्रखर चतुर्वेदी याने नाबाद 404 धावांची खेळी केली. त्यामुळे तो कुच बिहार ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 400 धावा करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने 638 चेंडूत 404 धावांची नाबाद खेळी केली. तसेच या खेळीत त्याने 46 चौकार आणि 3 षटकार मारले.

Prakhar Chaturvedi
IND-U19 vs SA-U19: फायनलमध्ये पावसाचा अडथळा! भारत-द. आफ्रिका युवा संघ तिरंगी मालिकेचे संयुक्त विजेते

प्रखरच्या 404 धावांच्या खेळीमुळे कर्नाटकने पहिल्या डावात 223 षटकात 8 बाद 890 धावा केल्या. दरम्यान, सामन्याचे दिवस पूर्ण झाल्याने हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

कर्नाटककडून प्रखर व्यतिरिक्त हर्षिल धर्मानीनेही दीड शतकी खेळी केली. त्याने 229 चेंडूत 169 धावांची खेळी केली. याशिवाय कार्तिकेय केपीने 72 धावांची अर्धशतकी खेळी केली, तर हार्दिक राजनेही 51 धावा आणि कार्तिक एसयूने 50 धावांची खेळी केली.

मुंबईकडून गोलंदाजीत प्रेम देवकरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मानन भट आणि नुतन यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. आकाश पवारने 1 विकेट घेतली.

Prakhar Chaturvedi
Rahul Dravid Son: U19 क्रिकेट गाजवत असलेल्या लेकाला द्रविड का देत नाही कोचिंग, स्वत:च केला खुलासा

तत्पुर्वी, या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 113.5 षटकात सर्वबाद 380 धावा केल्या होत्या. त्यामुळे कर्नाटकला 510 धावांची आघाडी मिळाली. दरम्यान, मुंबईकडून आयुष म्हात्रेने 145 धावांची खेळी केली. त्याचबरोबर आयुष सचिन वर्तकने 73 धावांची खेळी केली. त्याचबरोब नुतनने 44 धावांची खेळी केली.

कर्नाटककडून गोलंदाजी करताना हार्दिक राजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच समर्थ एन आणि समीत द्रविड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर अगस्त्य राजू आणि धीरज गोवडा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com