Chess World Cup Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Chess World Cup Goa: विश्वकरंडक बुद्धिबळात भारताची आशा आता अर्जुनवर, हरिकृष्णाचे आव्हान टायब्रेक फेरीतील पराभवाने संपले

Chess World Cup Goa: टायब्रेक फेरीत १५ मिनिटांतील वेळ बंधनातील दोन्ही रॅपिड डावांत निकाल लागला नाही. नंतर १० मिनिटांच्या रॅपिड डावात हरिकृष्णा याने पांढऱ्या मोहऱ्यांसह जिंकण्यासाठी जोर लावला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: अनुभवी भारतीय ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णा याची फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील मोहीम रविवारी पाचव्या फेरीतील टायब्रेकमध्ये संपुष्टात आली. त्याला मेक्सिकन ग्रँडमास्टर होजे एदुआर्द मार्टिनेज अलकांतारा याने रॅपिड डावांत पराभूत केले.

उत्तर गोव्यातील हडफडे येथे सुरू असलेल्या स्पर्धेत आता भारताचा आशा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी यांच्यावर आहेत. उपांत्यपूर्व (सहावी फेरी) फेरीत त्याच्यासमोर चीनचा ग्रँडमास्टर वेई यी याचे आव्हान असेल. अर्जुनने शनिवारी आगेकूच राखली होती.

त्याने दोन वेळचा माजी विश्वकरंडक विजेता लेव्हॉन अरोनियन याला दोन्ही क्लासिकल डावांत मिळून १.५-०.५ गुणफरकाने हरविले होते. हरिकृष्णाचे क्लासिकल प्रकारातील दोन्ही डाव बरोबरीत राहिल्यामुळे त्याला रविवारी टायब्रेक फेरीत खेळावे लागले. मात्र पेरु देशात जन्मलेला, पण मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारा ग्रँडमास्टर भारतीय खेळाडूस वरचढ ठरला.

टायब्रेक फेरीत १५ मिनिटांतील वेळ बंधनातील दोन्ही रॅपिड डावांत निकाल लागला नाही. नंतर १० मिनिटांच्या रॅपिड डावात हरिकृष्णा याने पांढऱ्या मोहऱ्यांसह जिंकण्यासाठी जोर लावला, पण मार्टिनेज याने अचूक प्रतिआक्रमण करत ५९ चालींनंतर ‘रुक-पॉन’च्या एंडगेममध्ये बाजी मारली. दुसऱ्या डावात हरिकृष्णाला काळ्या मोहऱ्यांसह खेळताना विजयाची अत्यावश्यकता होती, मात्र ३० चालींत बरोबरीवर समाधान मानावे लागल्याने त्याची वाटचाल खंडित झाली.

अशा होतील उपांत्यपूर्व लढती

सोमवारी उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या डावात जावोखिर सिंदारोव (उझबेकिस्तान) विरुद्ध होजे एदुआर्द मार्टिनेज अलकांतारा (मेक्सिको), वेई यी (चीन) विरुद्ध अर्जुन एरिगेसी (भारत), सॅम शँकलँड (अमेरिका) विरुद्ध आंद्रे एसिपेंको (फिडे), नोदिरबेक याकुबोएव (उझबेकिस्तान) विरुद्ध ॲलेक्झांडर डॉनचेंको (जर्मनी) यांच्यात लढती होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT