Goa Chess World Cup: जगज्जेत्या गुकेशचे आव्हान संपुष्टात! स्वेनने केले पराभूत; अर्जुन, प्रज्ञानंद, हरिकृष्ण, प्रणव चौथ्या फेरीत दाखल

FIDE Chess World Cup Gukesh: जगज्जेता भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याचे फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. शनिवारी दुसऱ्या डावात त्याला फ्रेडरिक स्वेन याने पराभूत केले.
Gukesh World Cup, Goa FIDE Chess, Indian Grandmaster Gukesh
Gukesh World Cup, Goa FIDE Chess, Indian Grandmaster GukeshDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जगज्जेता भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याचे फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. शनिवारी दुसऱ्या डावात त्याला फ्रेडरिक स्वेन याने पराभूत केले, त्यामुळे गुकेशला जागतिक अजिंक्यपदानंतर विश्वकरंडक जिंकणे शक्य झाले नाही. अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद, पी. हरिकृष्ण व जागतिक ज्युनियर विजेता व्ही. प्रणव यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धा उत्तर गोव्यातील हडफडे येथे सुरू आहे. फ्रेडरिक याने तिसऱ्या फेरीतील पहिल्या डावात शुक्रवारी गुकेशला बरोबरीत रोखले होते. शनिवारी २१ वर्षीय जर्मन ग्रँडमास्टरने वेळेच्या बंधनातून बाहेर पडत विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या गुकेशला कोंडीत पकडले. अखेर १९ वर्षीय जगज्जेत्यास माघार घेत पराभव मान्य करावा लागला. फ्रेडरिक याने १.५-०.५ गुणफरकाने पुढील फेरी गाठली.

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने आगेकूच राखताना आर्मेनियन ग्रँडमास्टर रॉबर्ट होव्हान्निसियान याला १.५-०५ असे हरविले. दुसऱ्या डावात प्रज्ञानंद विजयी ठरला. . पी. हरिकृष्ण याने बेल्जियमचा ग्रँडमास्टर डॅनियल दार्धा याला नमविले. पहिला डाव जिंकणाऱ्या हरिकृष्ण याने दुसऱ्या डावात झटपट बरोबरीस पसंती दिली.

Gukesh World Cup, Goa FIDE Chess, Indian Grandmaster Gukesh
Goa Chess: 38व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत वाढली चुरस! शौनक, दीक्षिता विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर

भारतीय बुद्धिबळपटूंत अव्वल असलेल्या अर्जुन एरिगैसी याने चौथी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीतील पहिल्या डावात पूर्ण गुण प्राप्त केलेल्या अर्जुन याने दुसऱ्या डावात उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर शम्सीद्दीन वोखिदोव याच्याविरुद्ध बरोबरीस पसंती दिली. प्रणव यानेही पहिल्या डावातील विजयानंतर ग्रँडमास्टर टिटास स्ट्रेमाव्हिसियस याच्याविरुद्ध दुसऱ्या डावातील बरोबरीसह आगेकूच राखली.

अन्य भारतीय खेळाडूंत दोन्ही डाव बरोबरीत राहिल्यामुळे विदित गुजराथी, कार्तिक व्यंकटरमण, एस. नारायणन यांना रविवारी टायब्रेक फेरीत खेळावे लागेल. दिप्तयान घोष याचे आव्हान संपुष्टात आले.

Gukesh World Cup, Goa FIDE Chess, Indian Grandmaster Gukesh
Chess Tournament: देशभरातील 600 खेळाडू भिडणार, 13 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा; लाखोंची बक्षिसे जाहीर

त्याला आर्मेनियाच्या गॅब्रिएल सार्गिस्सियान याने १.५-०.५ गुणफरकाने नमविले. एम. प्रणेश याचे आव्हानही आटोपले. जर्मन ग्रँडमास्टर व्हिन्सेंट केमर याने त्याला १.५-०.५ असे पराजित केले.

नेदरलँड्सचा ग्रँडमास्टर अनीश गिरी याचे आव्हानही तिसऱ्या फेरीत आटोपले. ‘विश्वनाथन आनंद करंडका’साठी अनीश प्रमुख दावेदार होता. तिसऱ्या फेरीतील दुसऱ्या डावात तो शनिवारी ४७ चालींत पराभूत झाला. त्यामुळे जर्मन ग्रँडमास्टर अलेक्झांडर डॉन्चेन्को याची सरशी झाली. जागतिक क्रमवारीत अनीश सध्या पाचव्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com