Goa Boxing Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Boxing Championship: गोव्याच्या लक्ष्मीची भारतीय बॉक्सिंग संघात निवड; एएसबीसी स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना

ASBC Boxing Championship: लक्ष्मी लमाणी हिची आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्येही वर्णी लागली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याची युवा महिला बॉक्सर लक्ष्मी लमाणी हिची आशियाई ज्युनियर-शालेय पातळीवरील एएसबीसी बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. स्पर्धेला संयुक्त अरब अमिरातीतील अल अईन येथे सुरवात झाली असून दहा सप्टेंबरपर्यंत चालेल.

लक्ष्मी हिने तिसऱ्या राष्ट्रीय सबज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत शानदार कामगिरी बजावताना सुवर्णपदक जिंकले होते. त्याआधारे तिची भारतीय संघात निवड झाली. लक्ष्मी हिची आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्येही वर्णी लागली आहे.

लक्ष्मी हिने सांगितले, की ‘‘देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. या पातळीवर येण्यासाठी मी खूप मेहनत घेतली असून गौरवास्पद वाटत आहे. सर्वोत्तम कामगिरीसह देशासाठी अभिमानास्पद कामगिरी बजावण्याचे लक्ष्य बाळगले आहे.’’ लक्ष्मी पूर्वी पर्वरी येथील एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूलमध्ये शिकत होती आणि तिला साल्वादोर द मुंद बॉक्सिंग केंद्रात चितंबरम नाईक यांचे मार्गदर्शन लाभत होते. यावर्षी एप्रिलमध्ये तिची आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये निवड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Nevri: मोदकांइतक्याच महत्वाच्या 'नेवऱ्या'! गोमंतकीय खाद्यपदार्थांचे वेगळेपण

Shai Hope Video: ‘असाही कोणी आउट होतो?’; शे होपची विचित्र विकेट पाहून चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल

Horoscope: राधाष्टमी आणि लक्ष्मी व्रताचा शुभ योग; 'या' 5 राशींसाठी रविवार ठरणार 'लकी'

गोव्याच्या जॅनामिका परेराची ‘उंच भरारी’; वयाच्या 21व्या वर्षी बनली पायलट

Konkan History: झाग्रोस पर्वतांच्या आसपासचे इराणी भारतीय उपखंडात आले! त्यांनी गहू, बार्ली, गुरेढोरे, मेंढ्या आणल्या; दख्खनमध्ये पोहोचले

SCROLL FOR NEXT