Boxing Tournament: गोव्याच्या लक्ष्मी लमाणीला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

Boxing Tournament: राष्ट्रीय सबज्युनियर बॉक्सिंग, सुमन पाटीलला रौप्य; ममता राऊत, वीर राणास ब्राँझ
Boxing Tournament
Boxing TournamentDainik Gomantak
Published on
Updated on

Boxing Tournament:

गोव्याच्या लक्ष्मी लमाणी हिने तिसऱ्या राष्ट्रीय सबज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत मुलींत सुवर्णपदक जिंकले. सुमन पाटील हिला रौप्य, तर ममता राऊत व वीर राणा यांना ब्राँझपदक प्राप्त झाले. स्पर्धेतील अंतिम लढती सोमवारी उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे झाली.

लक्ष्मी हिने जबरदस्त बॉक्सिंग करताना अंतिम लढतीत चंडीगडच्या नीती हिच्यावर मात केली. तिने ही लढत 5-0 या फरकाने आणि एकमुखी निर्णयाने जिंकली. लक्ष्मीला पहिल्या फेरीत नीती हिने थोडेफार झुंजविले. मात्र नंतर गोव्याच्या बॉक्सरने दुसऱ्या फेरीपासून पूर्ण वर्चस्व राखत राज्यासाठी सुवर्णपदक जिंकले.

साल्वादोर द मुंद येथे नियमित सराव करणाऱ्या लक्ष्मी हिला चितंबरम नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्याविषयी प्रशिक्षकाने सांगितले, की ‘‘लक्ष्मी प्रतिहल्ला चढविणारी बॉक्सर आहे. सुरवातीला ती आक्रमण करत नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूचा अंदाज आल्यानंतर ती तुटून पडते. ही व्यूहरचना यशस्वी ठरली.’’

Boxing Tournament
Goa Shigmotsav 2024: ‘घणचे कटर घण’ ‘ओस्सय ओस्सय’ मंगळवारपासून राज्यात शोभायात्रा; कधी, कुठे भेट द्याल, संपूर्ण वेळापत्रक

राष्ट्रीय स्पर्धेत पदके जिंकल्यामुळे लक्ष्मी लमाणी हिच्यासह सुमन पाटील, ममता राऊत व वीर राणा यांची राष्ट्रीय बॉक्सिंग शिबिरासाठी निवड होणार असल्याची माहिती गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेतर्फे देण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस व्हिएगस यांनी राज्याच्या सर्व पदक विजेत्या बॉक्सरचे अभिनंदन केले आहे. सुमन हिला अंतिम लढतीत हार पत्करावी लागले, त्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ममता व वीर यांचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यामुळे त्यांना ब्राँझपदक मिळाले.

Boxing Tournament
Rain In Surla: तांबडीसुर्लात कोसळल्या पावसाच्या सरी

‘ट्युरिस्ट गाईड’च्या मुलीची कमाल

लक्ष्मी हिचे वडील मंजुनाथ लमाणी हे पणजीत ट्युरिस्ट गाईड म्हणून कार्यरत आहे, तर आई शोभा मोलमजूरी करते. पर्वरी येथील एल. डी. सामंत मेमोरियल हायस्कूलमध्ये शिकणारी लक्ष्मी सप्टेंबर 2022 पासून चितंबरम यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सराव करते.

‘‘लक्ष्मी उपजत नैसर्गिक गुणवत्ता लाभलेली बॉक्सर आहे. तांत्रिकदृष्ट्या ती चांगली खेळते. भविष्यात तिच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत,’’ असे चितंबरम सुवर्णपदक विजेतीचे कौतुक करताना म्हणाले.

‘‘खडतर मेहनत घेतली आणि समर्पित राहिल्यास लक्ष्यप्राप्ती निश्चितच होते. आव्हाने नित्याचीच असतात. मी खूप आनंदी आहे आणि यापुढेही मला चांगली कामगिरी करायची आहे. राष्ट्रीय शिबिरात खूप काही शिकायचे असून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे.’’

- लक्ष्मी लमाणी, सुवर्णपदक विजेती बॉक्सर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com