पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघावर शनिवारी नीचांकी ५४ धावांत गारद होण्याची नामुष्की आली. टी-२० करंडक स्पर्धेत बडोद्याने त्यांच्यावर ९५ धावांनी सहज मात केली. एलिट ‘ब’ गट सामना हरियानातील लाहली येथे झाला.
बडोद्याने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४९ धावा केल्यानंतर गोव्याचा डाव १९.५ षटकांत संपुष्टात आला. कर्णधार तनया नाईक (१३) हिचा अपवाद वगळता एकही बॅटर दुहेरी धावसंख्या गाठू शकली नाही. गटात पहिला सामना जिंकल्यानंतर गोव्याच्या संघाला सलग चौथा पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांतील चार गुणांसह त्यांनी गटसाखळीतच मोहीम संपुष्टात आली.
संक्षिप्त धावफलक
बडोदा : २० षटकांत ६ बाद १४९ (मेस्वी पोकार ४७, निशात चंगीवाला ३४, नायशा तिवारी २२, हर्षिता यादव ४-०-२८-१, पूजा कलेल ४-०-२७-०, पूजा यादव २-०-२२-१, विधी भांडारे ३-०-२३-०, तनया नाईक ४-०-२७-२, आराधना सरोज ३-०-२१-२) वि. वि. गोवा : १९.५ षटकांत सर्वबाद ५४ (हर्षिता यादव १, रक्षंदा कळंगुटकर ०, जोया मीर २, प्रेषा नाईक १, अथश्री शिवारकर ५, तनया नाईक १३, पूजा कलेल २, हर्षदा कदम ८, पूजा यादव ०, आराधना सरोज नाबाद ७, विधी भांडारे ८, स्नेहा बारिया २-९, नृपा व्यास ३-४, निष्ठा खाटीक ३-८, हेतवी पटेल २-१६).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.