Goa Sports News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Senior T20 Cricket: गोव्याच्या महिलांची विजयी सलामी, सीनियर टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तराखंडला 13 धावांनी नमविले

Goa Women Cricket: गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर गोव्याच्या महिलांनी सीनियर टी-२० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी विजयी सलामी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर गोव्याच्या महिलांनी सीनियर टी-२० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी विजयी सलामी दिली. त्यांनी एलिट ड गटातील लढतीत उत्तराखंडला १३ धावांनी हरविले. सामना छत्तीसगडमधील रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला.

उत्तराखंडने नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. निर्धारित २० षटकांत गोव्याने ९ बाद १२१ धावा केल्या, नंतर उत्तराखंडचा डाव १०८ धावांत गुंडाळून सामना जिंकला. अखेरच्या आठ विकेट उत्तराखंडने ३९ धावांत गमावल्या. गोव्याला विजयाचे चार गुण मिळाले. गतमोसमात गोव्याच्या संघ निवड प्रक्रियेत दुर्लक्षित ठरलेली तनया नाईक सामन्याची मानकरी ठरली. गोव्याचा पुढील सामना गुरुवारी (ता. ९) रायपूर येथेच झारखंडविरुद्ध खेळला जाईल.

कमी धावसंख्येचे संरक्षण करताना गोलंदाजांची कामगिरी गोव्यासाठी निर्णायक ठरली. नंदिनी कश्यप (२५) व इंद्राणी रॉय (१६) यांनी ४२ धावांची सलामी दिल्यानंतर गोव्याच्या फिरकी गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजविले. तनया नाईक हिने १९ धावांत ४ गडी टिपले, तर श्रेया परब हिने १६ धावांच ३ खेळाडूंना बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः २० षटकांत ९ बाद १२१ (हर्षिता यादव १२, पूर्वजा वेर्लेकर २४, तनिशा गायकवाड ३३, पूर्वा भाईडकर १४, तनया नाईक १२, सुनंदा येत्रेकर ०, विनवी गुरव ३, उस्मा खान ९, श्रेया परब नाबाद ७, मेताली गवंडर २, विधी भांडारे नाबाद ०, मानसी जोशी ४-०-२४-२, बी. अमिशा ४-०-२३-३) वि. वि. उत्तराखंड ः २० षटकांत सर्वबाद १०८ (नंदिनी कश्यप २५, इंद्राणी रॉय १६, राघवी १६, नीलम १६, उस्मा खान ३-०-२३-०, मेताली गवंडर २-०-७-०, सुनंदा येत्रेकर ४-०-१९-१, श्रेया परब ४-०-१६-३, विधी भांडारे ४-०-१९-१, तनया नाईक ३-०-१९-४).

शिखाने केले बडोद्याचे प्रतिनिधित्व

गोव्याचे दोन दशके प्रतिनिधित्व केलेली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे यंदा बडोदा संघातर्फे खेळत आहे. गोवा क्रिकेट संघटनेची नोंदणी रद्द करण्याचे तिने अधिकृत कारण दिलेले नसले, तरी गतमोसमातील अपमानास्पद वागणुकीबद्दल ती कमालीची नाराज होती. बुधवारी गोव्याची माजी कर्णधार नव्या संघातर्फे मैदानात उतरली. मोहाली येथे झालेल्या सामन्यात बडोद्याने बिहारचा ७७ धावांनी पराभव केला. शिखाने फलंदाजीत आठ चेंडूंत १६ धावा केल्या, तसेच दोन षटकांत दहा धावा मोजल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yadava Dynasty Battle: चित्रप्रभू चालून गेला, अल्लाउद्दिनचे पुत्र ठार झाले! तुर्की सैन्यात एकच बोंबाबोंब झाली; खिलजीची देवगिरीवर स्वारी

'गोव्याची प्रतिमा धोक्यात येतेय!', 'कामसूत्र अँड ख्रिसमस' कार्यक्रमाचे आयोजन; महिला मंचाचा कडक आक्षेप

Komanda Kurumba Prabhu: महाप्रलयानंतर देश एक विशाल अरण्य होता, जिथे जंगली प्राणी होते, मानववंश उदयास आला; संघटित, सभ्य 'कुरुंब'

कृत्रिम अति-विलंबामुळे, जमिनी परप्रांतीय माफियांच्या ताब्यात गेल्याने, गोव्याचा ‘सत्यानाश’ झाल्याचे चित्र वर्तमानकाळात स्पष्टपणे दिसते..

Butterflies In Goa: 'ताकदवान क्रूजर युद्धनौकांवरुन नाव दिलेले, गोव्यात सर्वत्र आढळणारे फुलपाखरु'; फुलपाखरांतील राजेशाही

SCROLL FOR NEXT