Goa River Marathon 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

Goa River Marathon 2025: भारतातील लांब पल्ल्याच्या शर्यतीत गणली जाणारी गोवा रिव्हर मॅरेथॉन यंदा १४ डिसेंबर रोजी होणार आहे. एकंदरीत स्पर्धेची यंदा पंधरावी आवृत्ती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भारतातील लांब पल्ल्याच्या शर्यतीत गणली जाणारी गोवा रिव्हर मॅरेथॉन यंदा १४ डिसेंबर रोजी होणार आहे. एकंदरीत स्पर्धेची यंदा पंधरावी आवृत्ती आहे. देशविदेशातील सुमारे साडेसात हजारांहून जास्त धावपटू सहभागी होण्याचा विश्वास आयोजक वास्को स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष नितीन बांदेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश वासुदेवन, वास्को क्लब सचिव राकेश उन्नी, अभिजीत साळकर, रोआना कोस्ता व इतर मान्यवर उपस्थित होते. बांदेकर म्हणाले, की ‘‘यंदा पूर्ण मॅरेथॉन (४२ किलोमीटर), २० माईलर (३२ किलोमीटर), हाफ मॅरेथॉन (२१ किलोमीटर) १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा पाच गटांत शर्यत होईल. ‘शांतीसाठी धाव’ ही संकल्पना असून एकूण बक्षीस रक्कम आठ लाख रुपये आहे.

गोवा रिव्हर मॅरेथॉनला ‘अबॉर्ट वर्ल्ड मेजर्स संघटने’ची अधिस्वीकृती मिळाली आहे, त्यामुळे यंदापासून जागतिक मानांकन प्रणालीची अंमलबजावणी स्पर्धेत करण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धेची गुणवत्ता वाढेल. जागतिक पातळीवर स्पर्धेला मान्यता मिळेल.

यामुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धक धावपटूंना लंडन, बॉस्टन, न्यूयॉर्क आणि शिकागो आदी मॅरेथॉनमध्ये सहभागी होता येईल. मागील स्पर्धांचा आढावा घेतल्यास ४५ टक्क्यांनी सहभागी धावपटूंत वाढ झाली आहे. पूर्वी केवळ दोन टक्के महिला या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायच्या, आता सहभागी महिलांची टक्केवारी २८ टक्के इतकी वाढली असल्याचे राकेश उन्नी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT