Ramani Marathon: रामाणी मॅरेथॉनमध्ये सिद्धेश, एरियो अव्वल! 'सुदृढ आरोग्यासाठी वेळ काढा' असे पोलिस अधीक्षक सावंताचे आवाहन

Ramani Marathon Ponda 2024: आरोग्यासाठी थोडा वेळ काढा आणि सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम, तसेच किमान चालणे तरी अंगिकारा, असे आवाहन दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी केले. बांदोडा - फोंडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर एकोणिसावी डॉ. पी. एस. रामाणी मॅरेथॉन उत्साहात झाली.

Dr Ramani Marathon PondaDainik Gomantak
Published on
Updated on

Dr Ramani Marathon Ponda 2024

फोंडा: आरोग्यासाठी थोडा वेळ काढा आणि सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम, तसेच किमान चालणे तरी अंगिकारा, असे आवाहन दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी केले. बांदोडा - फोंडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर एकोणिसावी डॉ. पी. एस. रामाणी मॅरेथॉन उत्साहात झाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

समारोप सोहळ्यास व्यासपीठावर फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयनाथ कवळेकर तसेच मॅरेथॉनचे डॉ. पी. एस. रामाणी आदी उपस्थित होते.

सुनिता सावंत म्हणाल्या की, ‘‘समाजासाठी वावरताना या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून परोपकार जागवा आणि कार्य करा. मॅरेथॉनच्या माध्यमातून होणारा व्यायाम हा महत्त्वाचा आहे, पण केवळ मॅरेथॉनपुरते धावू नका, अशा प्रकारात सातत्य असणे गरजेचे आहे. आपल्याला उपयोगी पडणाऱ्या मित्रांची कास धरा. व्हॉटस् ॲप किंवा फेसबुकवर तुम्हाला बरेच मित्र भेटतील, पण जो खरा गरजेच्या वेळी उपयोगी पडतो, अशा मित्रांची संगत धरा.’’

डॉ. पी. एस. रामाणी म्हणाले की, ‘‘दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉन उत्साहात झाली, त्याचे समाधान वाटते, आजच्या युवा पिढीने आरोग्याकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. आरोग्यासाठी धावा, असा संदेश देताना आज आपण ८६ वर्षांचे असतानाही या मॅरेथॉनमध्यये भाग घेतो, ते लोकांच्या शुभाशीर्वादामुळेच.’’

सिद्धेश, एरियो मॅरेथॉनमध्ये अव्वल

मॅरेथॉनमध्ये महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. २१ किलोमीटरमध्ये पुरुष गटात सिद्धेश बोर्जे प्रथम, मदन किरूकर द्वितीय, तर निक्सेंगो तृतीय स्थानी आला. याच गटात महिलांमध्ये एरियो साकिया प्रथम, सपना पटेल द्वितीय, तर प्रियांका ओक्सा तृतीय स्थानी आली. १० किलोमीटर गटात पुरुषांत ओंकार बायकल पहिला, रोशन चंद्रकांत दुसरा, तर अक्षय सिनारी तिसऱ्या स्थानावर आला. महिलांमध्ये निकिता भाले पहिली, अयान युविटस दुसऱ्या स्थानावर, तर सुनिता कुमारी तिसऱ्या स्थानावर आली. लहान गटातील खास बक्षीस अर्णव याला देण्यात आले.

Ramani Marathon Ponda 2024: आरोग्यासाठी थोडा वेळ काढा आणि सुदृढ आरोग्यासाठी व्यायाम, तसेच किमान चालणे तरी अंगिकारा, असे आवाहन दक्षिण गोव्याच्या पोलिस अधीक्षक सुनिता सावंत यांनी केले. बांदोडा - फोंडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर एकोणिसावी डॉ. पी. एस. रामाणी मॅरेथॉन उत्साहात झाली.
Goa Tourism: आता गोव्याचा जलवा 'वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट'मध्ये! लंडनमध्ये पर्यटन खाते सादर करणार विविध उपक्रम

८६ वर्षांच्या ‘तरुणा’ची जिगर!

गेली एकोणीस वर्षे गोव्यात पी. एस. रामाणी मॅरेथॉन होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या मॅरेथॉनला देशभरातील धावपटूंकडून उत्साही प्रतिसाद लाभला. या मॅरेथॉनमध्ये ८६ वर्षांचे प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांची जिगर थक्क करणारी ठरली. तेच या मॅरेथॉनचे आयोजक असून ते तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने मॅरेथॉन धावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com