Goa vs Maharashtra Practice Match Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Ranji Trophy 2026: आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेसाठी गोव्याच्या संघाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आगामी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेसाठी गोव्याच्या संघाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संभाव्य संघ पुणे येथे महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने खेळेल.

गोवा क्रिकेट असोसिएशनकडून (जीसीए) प्राप्त माहितीनुसार, भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याचा सीनियर पुरुष संघ महाराष्ट्राविरुद्ध दोन तीन दिवसीय सराव सामने खेळेल.

महाराष्ट्र हा रणजी स्पर्धेतील मातब्बर संघ असल्यामुळे गोव्याच्या संघातील खेळाडूंच्या कामगिरीकडे सीनियर संघ निवड समिती बारकाईने लक्ष ठेवून असेल. पहिला सामना २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत, तर दुसरा सामना ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत खेळला जाईल.

गोव्याची रणजी करंडक स्पर्धा मोहीम ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर बडोदा संघाविरुद्ध होईल.

त्यानंतर एलिट अ गटात उत्तर प्रदेश, विदर्भ व बिहार या संघांविरुद्ध लढती होतील. रणजी स्पर्धा जानेवारीत पुन्हा सुरू झाल्यानंतर गोव्याचा संघ पुदुचेरी, मध्य प्रदेश व गतविजेत्या जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध खेळेल. बडोदा, बिहार व पुदुचेरी या संघांविरुद्धचे सामने घरच्या मैदानावर गोव्याचा संघ खेळेल.

ओमान, कर्नाटकातील स्पर्धेत लक्षवेधी

रणजी स्पर्धा मोसमपूर्व तयारीनिमित्त गोव्याने ओमान दौरा केला. तेथे टी-२० व एकदिवसीय मालिकेत गोव्याने शानदार खेळ एकदिवसीय मालिका जिंकली. नंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) डॉ. कॅप्टन के. थिम्माप्पिया स्मृती स्पर्धेत गोव्याने गुजरातवर दणदणीत विजय प्राप्त केला, तर केएससीए अध्यक्षीय संघ व विदर्भाविरुद्ध तुल्यबळ लढत दिल्यानंतर विजय थोडक्यात हुकला होता. 

कर्णधारपदी नवा चेहरा?

केएससीए क्रिकेट स्पर्धेतील दोन सामन्यांत नेतृत्व केलेला गोव्याचा अनुभवी फलंदाज स्नेहल कवठणकर जायबंदी झाल्यामुळे तिसरा सामना खेळू शकला नव्हता. गुजरातविरुद्धच्या विजयात अभिनव तेजराणा याने गोव्याचे कर्णधारपद सांभाळले होते. नव्या रणजी मोसमापूर्वी निवड समिती स्नेहलच्या तंदुरुस्तीकडे लक्ष ठेवून आहे, असे जीसीएतील सूत्राने नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Ranji Trophy: गोव्याची गोलंदाजी पुन्हा निष्प्रभ! बडोद्याचा 472 धावांचा डोंगर; अतीत शेठचे शतक एका धावेने हुकले

SCROLL FOR NEXT