Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

Goa Rice Farming Rain Shortage: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असून, आता भाताला कणसे धरू लागली आहेत.
Goa Rice Farming Rain Shortage
Goa Rice Farming Rain ShortageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असून, आता भाताला कणसे धरू लागली आहेत. या काळात भातशेतीला पाण्याची गरज असते. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी हलकी सर बरसणे आवश्यक आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास भातशेतीवर परिणाम होण्याची शक्यता कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी व्यक्त केली.

राज्यातील शेतीचा कृषी विभागाने मागील शुक्रवारी आढावा घेतला होता. या आठवड्यात पुरेसा पाऊस न झाल्यास प्रामुख्याने कमी पाण्याचे स्रोत असलेल्या मरड क्षेत्रातील भातशेतीला अधिक धोका निर्माण होऊ शकतो, असे देसाई यांनी सांगितले. कणसे फुटण्याच्या काळात भाताला पुरेसे पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

Goa Rice Farming Rain Shortage
Goa Helipad Viral Stunt : रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

शेतीवर विभागाची बारीक नजर

राज्यातील कृषीस्थितीवर विभागाचे लक्ष असून, मंगळवारी कृषी अधिकारी पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातशेतीसह अन्य पिकांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर शेती वाचविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे देसाई यांनी सांगितले. विभागाचे शेतीवर बारीक लक्ष ठेवले आहे.

जलस्रोतांचा वापर करा

पुढील दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे. मात्र, पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांनी तलाव, विहिरी तसेच अन्य उपलब्ध जलस्रोतांचा वापर करून भातशेतीला पुरेसे पाणी द्यावे आणि योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Goa Rice Farming Rain Shortage
Goa Weather Alert Update : गोव्यात विजांसह वादळी वाऱ्याचा इशारा; पुढील तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज, राज्यात यलो अलर्ट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com