Goa Olympic Association election Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Goa Olympic Association election: गोवा ऑलिंपिक असोसिएशनची (जीओए) नियोजित निवडणूक राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार होत असल्यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर संघटनेला नवा सचिव लाभणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा ऑलिंपिक असोसिएशनची (जीओए) नियोजित निवडणूक राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार होत असल्यामुळे तब्बल २१ वर्षांनंतर संघटनेला नवा सचिव लाभणार आहे. गुरुदत्त भक्ता यांनी प्रतिष्ठेचे पद दोन दशके सांभाळले, त्या कालावधीत राज्यात महत्त्वाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्या.

जीओए निवडणूक २५ ऑगस्ट रोजी नियोजित आहे, १५ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, १९ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेला निवडणुकीचे एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे संघटनेचे अध्यक्ष बनणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

ते मावळते अध्यक्ष केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची जागा घेऊ शकतात. राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार श्रीपाद नाईक यांची मुदत संपली आहे, याच कारणास्तव भक्ता हे सुद्धा ‘जीओए’च्या कार्यकारी समितीतून तब्बल २४ वर्षे सेवा बजावल्यानंतर ‘निवृत्त’ होत आहेत. २००२ ते २०२६ कालावधीत भक्ता यांनी राज्यातील ऑलिंपिक चळवळीत योगदान दिले. १९९७ पासून त्यांनी गोवा ज्युडो संघटनेतही प्रशासकीय जबाबदारी सांभाळली.

गुरुदत्त भक्ता यांनी २००२ ते २००५ या कालावधीत ‘जीओए’चे खजिनदारपद भूषविले, नंतर २००५ ते आता २०२६ पर्यंत त्यांनी जीओए सचिवपदाची जबाबदारी समर्थपणे निभावली. ते खजिनदार-सचिव या पदांवर असताना गोव्याने २००२ ते २०२५ पर्यंत सहा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत भाग घेतला, त्यापैकी २०२३ मधील स्पर्धा गोव्यात झाली.

ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा वारंवार लांबणीवर पडल्यामुळे चर्चेत राहिली, पण अखेरीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने अखेर तीन वर्षांपूर्वी स्पर्धेचे शिवधनुष्य पेलले

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री आणि संजय बांदेकर क्रीडामंत्री असताना २००२-२००७ या कालावधीत गुरुदत्त भक्ता यांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाचे खजिनदारपदही भूषविले होते. या कालावधीत गोव्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या यजमानदासाठी बोली लावली होती.

लुसोफोनिया स्पर्धा गोव्यात यशस्वी

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना गोव्याने पोर्तुगीज भाषिक देशांची लुसोफोनिया क्रीडा स्पर्धा घेण्याचे आव्हान समर्थपणे स्वीकारले आणि १८ ते २९ जानेवारी २०१४ या कालावधीत नव्या साधन सुविधांसह आयोजन यशस्वी ठरले. या स्पर्धेच्या कालावधीत भक्ता जीओए सचिव होते, तसेच लुसोफोनिया स्पर्धेच्या ‘ॲकॉलॉप’ समितीचे उपाध्यक्षपद २०१० ते २०१४ या कालावधीत भूषविले.

‘आयओए’ कार्यकारिणीत प्रतिनिधित्व

जीओए सचिव असताना भक्ता यांची २०१७ ते २०२२ या कालावधीसाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) कार्यकारिणीत सदस्यपदी निवड झाली होती, तसेच २०१८ मध्ये अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स येथे झालेल्या यूथ ऑलिंपिकसाठी ‘आयओए’ने त्यांची भारताचे पथक प्रमुख (शेफ द मिशन) म्हणून नियुक्ती केली होती.

एकूण तीन लुसोफोनिया क्रीडा स्पर्धा, तसेच ऑक्टोबर २०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भक्ता यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT