Ranji Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Swapnil Asnodkar Kerala Coach: गोव्याचे माजी क्रिकेट कर्णधार, आयपीएल स्पर्धा गाजविलेले स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे २०२६-२७ मोसमासाठी केरळ क्रिकेट असोसिएशनने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजीः गोव्याचे माजी क्रिकेट कर्णधार, आयपीएल स्पर्धा गाजविलेले स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे २०२६-२७ मोसमासाठी केरळ क्रिकेट असोसिएशनने महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. त्यांची रणजी संघाबरोबरच एकदिवसीय आणि टी-२० स्पर्धेसाठी सीनियर पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

केरळ क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियाद्वारे स्वप्नील यांच्या नियुक्तीची माहिती दिली. ४२ वर्षीय स्वप्नील भारताचे माजी आंतरराष्ट्रीय अमेय खुरासिया यांची जागा घेतील. मागील दोन मोसम खुरासिया केरळच्या सीनियर क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. गतमोसमात (२०२५-२६) स्वप्नील केरळच्या २३ वर्षांखालील पुरुष संघाचे प्रशिक्षक होते, यावेळच्या मोसमात त्यांना बढती मिळाली आहे. 

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०२६-२७ मोसमात केरळचा संघ एलिट क गटात खेळणार असून बंगाल, झारखंड, महाराष्ट्र, सेनादल, गुजरात, दिल्ली व ओडिशा हे गटातील अन्य संघ आहेत. स्पर्धेला ११ ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे.  स्वप्नील हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लेव्हल-२ प्रमाणित प्रशिक्षक आहेत.

२०२५-२६ मोसमात केरळच्या २३ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक-मेंटॉर ही भूमिका निभावण्यापूर्वी त्यांनी २०२४-२५ मध्ये नागालँडच्या रणजी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ही जबाबदारी पेलली होती, त्या मोसमात नागालँडचा संघ रणजी एलिट स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यांनी गोव्याच्या १९ वर्षांखालील व २३ वर्षांखालील संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले आहे. या वर्षी जूनमध्ये झालेल्या बीसीसीआय १९ वर्षांखालील सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) शिबिरासाठी त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. 

यशस्वी फलंदाज स्वप्नील...

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००१-०२ ते २०१७-१८ पर्यंत कारकीर्द

गोवा आणि दक्षिण विभागातर्फे मिळून ८८ प्रथम श्रेणी सामन्यांत0 १४ शतकांसह ५८८३ धावा

देवधर करंडक एकदिवसीय स्पर्धेत शतक झळकावणारा एकमेव गोमंतकीय फलंदाज

भारत अ संघातून २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व

२००८ मधील आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सतर्फे १३३.४७च्या स्ट्राईक रेटने ३११ धावा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

Goa Language Politics: गोमंतकीय भाषावादाची वृद्धावस्थेकडे वाटचाल? 'राजभाषा करा नाहीतर खुर्ची खाली करा'नंतरही निर्धार समितीचा तिसरा पर्याय कुठे हरवला?

Crime News: UAE मध्ये भारतीयाची निर्घुण हत्या, मृतदेहाचे केले 9 तुकडे, बायको-मुलगा गायब; नोकरीनिमित्त शारजाहला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला

Cylinder Scheme: '3 सिलिंडर' योजनेचा 50 हजार महिलांना लाभ, दीड लाख अर्ज; 40 हजार अर्ज पतींच्या नावाने, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT