Rajasthan vs Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Rajasthan vs Goa womens T20: गोव्याच्या महिला संघाचा विजय, 23 वर्षांखालील टी-20 सामन्यात राजस्थानला नमविले

Goa vs Rajasthan: गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने सोमवारी विजयी सलामी देताना राजस्थानला ३८ धावांनी हरविले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने सोमवारी विजयी सलामी देताना राजस्थानला ३८ धावांनी हरविले. एलिट ड गट सामना सिव्हिल लाईन्स-नागपूर येथील व्हीसीए स्टेडियमवर झाला.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस पाचारण केल्यानंतर गोव्याने निर्धारित २० षटकांत ४ बाद १५९ धावा केल्या. तनिशा गायकवाड (५१, ४६ चेंडू, ८ चौकार) व उस्मा खान (५६, २९ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार) यांनी शानदार अर्धशतके नोंदविताना दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली.

नंतर राजस्थानला निर्धारित २० षटकांत ७ बाद १२१ धावाच करता आल्या. एकवेळ त्यांची ४ बाद ३८ अशी घसरण झाली होती. गोव्यातर्फे मेताली गवंडर हिने २१ धावांत ३ गडी बाद केले, तर अष्टपैलू चमक दाखविताना उस्मा हिने दोघींना टिपले.

पहिल्याच सामन्यातील विजयामुळे गोव्याला चार गुण मिळाले. त्यांची पुढील सामना मंगळवारी (ता. २५) बंगालविरुद्ध होईल.

संक्षिप्त धावफलक ः गोवा ः २० षटकांत ४ बाद १५९ (हर्षिता यादव २७, ऊर्वशी गोवेकर ०, तनिशा गायकवाड ५१, उस्मा खान ५६, अथश्री शिवारकर नाबाद १६, स्वराली कासार नाबाद १, शानू १-३१, डिंपल कंवर १-९, अर्चना योगी १-२५, सिद्धी शर्मा १-२६) वि. वि. राजस्थान ः २० षटकांत ७ बाद १२१ (डिंपल कंवर १९, भाविनी भार्गव नाबाद ३६, अंजली जाट १७, मेताली गवंडर ४-०-२१-३, उस्मा खान ४-०-२२-२, सेजल नाईक ३-०-२०-०, पूजा कलेल २-०-२२-०, विधी भांडारे ३-०-१५-१, तनया नाईक ४-०-२१-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: 'युनिटी मॉल स्थानिकांसाठी महत्वपूर्ण'! खंवटेंचे प्रतिपादन; रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचा केला दावा

GMC: ‘गोमेकॉ’च्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी! 4 IMA MSN सन्मान मिळवणारे ठरले पहिले महाविद्यालय

Bicholim Crime: 2 महिला, एका बालिकेची निर्घृण हत्‍या! एक मृत्‍यू संशयास्‍पद; महिलांसोबतच्या वाढत्या घटनांनी डिचोली हादरले

Fishermen Pele: 'चर्चवरील हल्ल्याने मन व्यथित झाले'! मच्छीमार पेलेने व्यक्त केली खंत; दोषींवर कारवाईची केली मागणी

पर्यटकांसाठी महत्वाची अपडेट! गोव्यातून परतीचा प्रवास महागला; तिकीटदर दुपटीपेक्षा जास्त; वाढीव रकमेमुळे कोलमडले बजेट

SCROLL FOR NEXT