Goa Tourism: पर्यटन हंगामास सुरुवात; विदेशी पर्यटकांची संख्या घटली, देशी पर्यटकांत वाढ

Goa Tourist: पेडणे किनारी भागात पर्यटन हंगामास सुरुवात झाली; परंतु यंदा विदेशी पर्यटक कमी असून देशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : पेडणे किनारी भागात पर्यटन हंगामास सुरुवात झाली; परंतु यंदा विदेशी पर्यटक कमी असून देशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी या किनाऱ्यावरील स्थानिक व बिगर गोमंतकीय व्यावसायिकांनी आपापली रेस्टॉरंट रिसॉर्ट सज्ज ठेवलेली आहेत. विदेशी पर्यटक कमी येण्यामागची कारणे अनेक आहेत.

टॅक्सी दर वाढलेले आहेत, तिकीट दर वाढलेले आहेत, शिवाय घरे-खोल्यांचे दर वाढलेले दिसून येतात. त्यामुळे विदेशी पर्यटक गोव्यात आल्यानंतर नंतर लगेच हम्पी, कारवार, मुर्डेश्वर, गोकर्ण या भागात जात असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Goa Tourism
Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

विदेशी पर्यटकांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा नाहीत, किनारे स्वच्छ ठेवले जात नाहीत, किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री दिसून येतात. शिवाय अनेक ठिकाणी भिकारी विदेशी पर्यटकांना सतावण्याचे काम करतात. त्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या कमी होत आहे.

ला कबाना रिसॉर्टचे व्यवस्थापक हरी म्हामल यांनी सांगितले की, विदेशी पर्यटकांची संख्या किनाऱ्यावर खूपच कमी दिसून येते. किनारे अस्वच्छ ठेवले जातात, विदेशी पर्यटकांना सुरक्षा नसते, देशी पर्यटक काही प्रमाणात विदेशी पर्यटकांना सतावण्याचेही काम करतात. साधनसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

Goa Tourism
Goa Agriculture: कृषी लागवडीत 1.927 हेक्‍टरने घट! भात लागवडीचे 10,207 हेक्‍टर क्षेत्र घटले; 11 वर्षांचा तपशील

तीन-चार महिने वास्तव्य

पेडणे तालुक्यात ज्यावेळी विदेशी पर्यटक किनारी भागात येतो, त्यावेळी तो तेथील स्थानिकांचे घर-खोल्या भाड्याने घेऊन तीन ते चार महिने सलगपणे वास्तव्य करतो. याचा त्या स्थानिकाला बऱ्यापैकी लाभ होतो. परंतु जे देशी पर्यटक असतात, ते दोन किंवा तीन दिवसांसाठी येतात आणि लगेच जातात.

त्यांच्याकडून स्थानिकांना कमी प्रमाणात मोबदला मिळत असतो. मात्र, वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक गोव्यात किनारी भागात येतात. त्या ठिकाणी ते आल्यानंतर कधी कधी स्थानिकांशी त्यांचे खटके उडतात. त्यातून मग मारहाणीसारखे प्रकार घडतात आणि त्यातून गोव्याचे नाव बदनाम होते. दंगा-मस्ती करून गोव्याची बदनामी करण्याची कारस्थाने करू नका, असे आवाहनही काही पर्यटक करताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com