Goa Blitz Chess Tournament 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

Ethan Vaz: इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझ याने आर्यन चेस अकादमी व सीरियल चेस क्लब यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या अखिल गोवा ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Blitz Chess Tournament 2024

पणजी: इंटरनॅशनल मास्टर (आयएम) एथन वाझ याने आर्यन चेस अकादमी व सीरियल चेस क्लब यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या अखिल गोवा ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. स्पर्धेत अपराजित राहताना त्याने सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली.

स्पर्धा मडगाव येथे झाली. आयएम नितीश बेलुरकर आठ गुणांसह उपविजेता ठरला. कविश घारसे याला साडेसात गुणांसह तिसरा क्रमांक मिळाला, तर तेवढेच गुण झालेल्या दिल्लीच्या सुप्रियो दास याने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिळविले. महाराष्ट्राच्या ओमकार कडव याला सात गुणांसह पाचवे स्थान मिळाले.

नीरज सारिपल्ली, जोशुआ तेलिस, तेजस शेट वेरेकर, शुभ बोरकर, देवेश नाईक, एड्रिक वाझ, अनर शायाकबेरोव, चैतन्य गावकर, यश प्रभू, अथर्व सावळ, गुंजल चोपडेकर, सरस पोवार, चैतन्य पाटील, गौरव, दत्ता कांबळी यांना अनुक्रमे सहावा ते विसावा क्रमांक प्राप्त झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT