GCA Premier League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GCA Premier League: स्नेहल, अमन यांच्या शतकांमुळे धेंपो क्लबचा वरचष्मा; अंतिम लढतीत चौगुले क्लबविरुद्ध पहिल्या दिवशी 5 बाद 412 धावा

Snehal Kauthankar 136 not out GCA Premier League: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग अंतिम लढतीत बुधवारी धेंपो क्रिकेट क्लबने वरचष्मा राखला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कर्णधार स्नेहल कवठणकर (नाबाद १३६) व अमन धूपर (१२४) यांची शतके, तसेच अभिनव तेजराणा (७०) याच्या अर्धशतकाच्या बळावर गोवा क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग अंतिम लढतीत बुधवारी धेंपो क्रिकेट क्लबने वरचष्मा राखला. पहिल्या दिवसअखेर त्यांनी चौगुले स्पोर्टस क्लबविरुद्ध ५ बाद ४१२ धावा केल्या.

पिंक बॉल डे-नाईट चार दिवसीय अंतिम लढतीला बुधवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरवात झाली. धेंपो क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण चौगुले क्लबचा वेगवान गोलंदाज शुभम तारी याने आदित्य कोटा (२) व सार्थक भिके (२) यांना लागोपाठ बाद करून ४.२ षटकांत प्रतिस्पर्ध्यांची २ बाद ११ अशी नाजूक स्थिती केली.

त्यानंतर रणजीपटू अभिनव तेजराणा व २३ वर्षांखालील संघातील अमन धूपर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी करून धेंपो क्लबला सावरले. चौगुले क्लबचा कर्णधार दर्शन मिसाळ याने अभिनवला पायचीत बाद करून धोकादायक जोडी फोडली. अभिनव याने ९३ चेंडूंत आठ चौकार व दोन षटकारांच्या मदतीने ७० धावा केल्या.

अमन याने कर्णधार स्नेहल कवठणकर याच्यासमवेत आणखी एक शतकी (१३० धावा) भागीदारी करून धेंपो क्लबला मजबूत स्थिती गाठून दिली. पार्ट टाईम लेगब्रेक गोलंदाज प्रद्युम्न अटपडकर याने अमन याला पायचीत करून चौगुले क्लबला दिलासा दिला. अमन याने १६६ चेंडूंत १२ चौकार व पाच षटकारांसह १२४ धावा केल्या. दर्शनने राहुल मेहता (१९) याला जास्त काळ टिकू दिले नाही.

स्नेहलच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा

प्रकाशझोतात शतक पूर्ण केलेल्या स्नेहलने युवा फलंदाज जीवन चित्तेम याच्या साथीत पाचव्या विकेटसाठी ९० धावांची अभेद्य चिवट भागीदारी रचून धेंपो क्लबला पहिल्याच दिवशी चारशे धावा करण्यात मदत केली. स्नेहल याने यंदाच्या स्पर्धेतील दुसरे शतक करताना सर्वाधिक धावा करण्याचाही मान मिळविला.

त्याने एकूण ५५० धावा करताना यश कसवणकर (५४३ धावा) याला दुसऱ्या स्थानी ढकलले. स्नेहलने नाबाद खेळीत १४८ चेंडूंचा सामना करताना १८ चौकारांच्या मदतीने १३६ धावा केल्या. दिवसअखेर त्याला चांगली साथ दिलेला जीवन ३९ धावांवर खेळत आहे.

संक्षिप्त धावफलक

धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव ः ८९ षटकांत ५ बाद ४१२ (अभिनव तेजराणा ७०, अमन धूपर १२४, स्नेहल कवठणकर नाबाद १३६, जीवन चित्तेम नाबाद ३९, शुभम तारी २-४४, दर्शन मिसाळ २-९८) विरुद्ध चौगुले स्पोर्टस क्लब.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT