Mansion House Cup Goa FC Siolim Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Mansion House Cup: चुरशीच्या लढतीत FC शिवोली जिंकली! पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवले कुडतरी जिमखान्यास

Mansion House Cup Goa: निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ असे गोलबरोबरीत होते. १२व्या मिनिटास ॲन्सलेम फर्नांडिसने कुडतरी जिमखान्यासाठी पहिला गोल केला. शिवोली संघाने १-१ अशी बरोबरी साधली.

Sameer Panditrao

पणजी: एफसी शिवोलीने अतिशय उत्कंठावर्धक लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये कुडतरी जिमखान्यास ४-१ असे नमवून कुंकळ्ळी युनियनच्या पहिल्या अखिल गोवा मॅन्शन हाऊस कप फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामना रविवारी कुंकळ्ळी येथील मैदानावर झाला.

निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ असे गोलबरोबरीत होते. १२व्या मिनिटास ॲन्सलेम फर्नांडिसने कुडतरी जिमखान्यासाठी पहिला गोल केला. २५व्या मिनिटास गौरव वायगणकर याच्या गोलमुळे शिवोली संघाने १-१ अशी बरोबरी साधली. विश्रांतीला हाच गोलफरक होता. ४५व्या मिनिटास पुष्पराज मांद्रेकर याने एफसी शिवोलीला २-१ असे आघाडीवर नेले.

६०व्या मिनिटास कुडतरी जिमखान्याने मुसंडी मारताना शिवोलीला गोलफरकात गाठले. ॲन्सलेम फर्नांडिस याने आणखी एक गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये एफसी शिवोलीसाठी मयुरेश नाईक, गौरव वायगणकर, पुष्पराज मांद्रेकर, लवनय शिरोडकर यांनी गोल केले, तर कुडतरी जिमखान्यातर्फे फक्त सावियो पिशोट एकटाच गोल करू शकला.

बक्षीस वितरण सोहळा क्रीडामंत्री रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, तिलकनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे राज्य प्रमुख विनीतकुमार बोथरा, कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्हास, फादर एरमितो कुतिन्हो, आर्तेमियो दा सिल्वा, लविता मास्कारेन्हास, सिद्धेश कुराडे, शैलेश वैद्य, अँजेला डायस, मेल्विन कॉस्ता यांच्या उपस्थितीत झाला.

वैयक्तिक बक्षिसे

सर्वोत्तम गोलरक्षक ः जॉन्सन भगत (कुडतरी जिमखाना, मध्यरक्षक ः विदेश सावंत (एफसी शिवोली), उत्कृष्ट खेळाडू ः मयुरेश नाईक (एफसी शिवोली), बचावपटू ः जेम्स फर्नांडिस (कुडतरी जिमखाना), आघाडीपटू ः पुष्पराज मांद्रेकर (एफसी शिवोली).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT