New Coach of Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाला 13 वर्षांनंतर मिळाला 'Indian Coach', 'या' माजी खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी

Khalid Jamil Becomes New Coach of Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघाच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. खालिद जमील यांची संघाच्या नवीन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Khalid Jamil Becomes New Coach of Indian Football Team
Khalid Jamil Becomes New Coach of Indian Football TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Khalid Jamil New Coach of Indian Football Team

भारतीय फुटबॉल संघाच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. खालिद जमील यांची संघाच्या नवीन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) ही घोषणा केली आहे.

माजी कर्णधार आयएम विजयन यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समितीच्या उपस्थितीत एआयएफएफ कार्यकारी समितीने वरिष्ठ भारतीय पुरुष राष्ट्रीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदी खालिद जमील यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.

भारतीय फुटबॉल संघाला १३ वर्षांनंतर भारतीय प्रशिक्षक मिळाला आहे. यापूर्वी, सावियो मेडेरा २०११-१२ मध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते.

खालिद जमील हे मनोलो मार्केझ यांची जागा घेतील, ज्यांनी गेल्या महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ गेल्या एका वर्षात एकही सामना जिंकू शकला नाही. २२ जुलै रोजी एआयएफएफ तांत्रिक समितीने राष्ट्रीय संघ संचालक सुब्रत पाल यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर प्रशिक्षकासाठी तीन जणांची यादी तयार केली.

त्यात माजी राष्ट्रीय प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टँटाईन, स्लोवाकियन व्यवस्थापक स्टीफन तारकोविक आणि खालिद जमील यांची नावे होती. शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी खालिद जमील यांची भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com