FC Goa vs Sporting Club Delhi at Fatorda Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL Football: आयएसएलमध्ये एफसी गोवा विजयाच्या शोधात! फातोर्ड्यात स्पोर्टिंग क्लब दिल्लीशी भिडणार

FC Goa vs Sporting Club Delhi ISL match: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी त्यांच्यासमोर अगोदरचे दोन्ही सामने गमावलेल्या स्पोर्टिंग क्लब दिल्ली संघाचे आव्हान असेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

Indian Super League FC Goa fixture: एएफसी चॅलेंज लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच राखण्यात असमर्थ ठरलेला एफसी गोवा संघ बुधवारपासून (ता. २८) इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेस पुन्हा सुरवात करणार आहे.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर बुधवारी त्यांच्यासमोर अगोदरचे दोन्ही सामने गमावलेल्या स्पोर्टिंग क्लब दिल्ली संघाचे आव्हान असेल. एफसी गोवा आयएसएल स्पर्धेत एक सामना खेळला असून त्यांनी चेन्नईयीन एफसीला फातोर्डा येथे १० ऑक्टोबर रोजी झालेल्या लढतीत १-१ असे गोलबरोबरीत रोखून एका गुणाची कमाई केली होती. दिल्ली संघाला अनुक्रमे बंगळूर एफसी (२-३) व मोहन बागान (१-२) या बलाढ्य संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला.

एफसी गोवाकडून बुधवारी घरच्या मैदानावर विजयाची अपेक्षा असेल. एएफसी चॅलेंज लीग स्पर्धेत गतआठवड्यात कुवेत येथे एफसी गोवाने तीन लढतीतून तीन गुणांची कमाई केली. त्यात एक विजय नोंदविला, तर दोन सामने गमावले. गोलरक्षक बॉब जॅक्सन राज हा गोव्याच्या संघासाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

मात्र, हर्ष पत्रे आणि आकाश सांगवान यांना दुखापतीमुळे आणखी काही काळ मैदानाबाहेर राहावे लागणार आहे, अशी माहिती मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांनी दिली. एफसी गोवाचा स्पॅनिश आघाडीपटू चिकी (ख्रिस्तियन बोरेगो) याने शानदार फॉर्म प्रदर्शित करताना आयएसएलमधील एक व एएफसी चॅलेंज लीगमधील तिन्ही सामन्यांत प्रत्येकी एक असे एकूण चार गोल केले आहे.

आणि ‘चिकी’ टोपणनाव चिकटले

एफसी गोवाचा स्पॅनिश आघाडीपटू ख्रिस्तियन बोरेगो याला ‘चिकी’ या टोपणनावानेच ओळखले जाते. याविषयी या तीस वर्षीय खेळाडूने पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘‘लहानपणी मी उंचीने कमी होतो, त्यामुळे मला सवंगडी चिकी या टोपणनावाने हाक मारत असत. स्पॅनिश भाषेत चिकी म्हणजे ठेंगणा. मी मोठा झालो, तरी हेच टोपणनाव कायम राहिले आणि मलाही ते खूप आवडू लागले.’’

‘‘वैयक्तिक कामगिरीपेक्षा माझे संघाच्या विजयाला जास्त प्राधान्य असते. विजय मिळवून देणारे गोल करणे मला जास्त आवडते.’’

- ख्रिस्तियन ‘चिकी’ बोरेगो, एफसी गोवाचा आघाडीपटू

‘‘प्रत्येक सामना महत्त्वाचा असून स्पोर्टिंग क्लब दिल्लीविरुद्धचा सामनाही निर्णायक आहे. त्यांनी लागोपाठ दोन सामने गमावले असले, तरी आम्ही त्यांना कमी लेखत नाही. एएफसी चॅलेंज लीगनंतर आयएसएल मोहिमेस विजयाने सुरवात करण्याचा आमचा प्रयत्न असेल.’’

- गौरमांगी सिंग, एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nigeria Crime: जीव वाचवण्यासाठी लोकांनी नदीत घेतल्या उड्या, बंदूकधाऱ्यांचा हैदोस! नायजेरियातील भीषण हल्ल्यात 62 जणांचा मृत्यू; हजारो बेघर

Goa Agriculture: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

Neeraj Yadav Demise: भारतानं गमावला हिरा! तीन वेळचा पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता नीरज यादवचं निधन; विष प्राशन करुन संपवलं जीवन

POCSO Case Quashed: पॉक्सो गुन्हा आणि आरोपपत्र रद्द; याचिकाकर्ता व पीडित कुटुंबीयांना 3 लाखांचा दंड

Goa Vehicle Sales: गोव्यात दसऱ्याला वाहन खरेदीचा वेग मंदावला! नोंदणीत तब्बल 37.70 टक्क्यांची घट

SCROLL FOR NEXT