Goa Ring Road Plan: गोव्यात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 'रिंग रोड'चा विचार! CM सावंत यांचे मोठे संकेत

Goa Traffic Congestion: राज्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी ‘रिंग रोड’ उभारण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
Goa Traffic Congestion
Goa Ring Road PlanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी ‘रिंग रोड’ उभारण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली अटल भवन येथे ही बैठक झाली.

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, खासदार सदानंद शेट तानवडे, प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येंकर, सर्वानंद भगत, मंत्री, आमदार तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने केलेल्या चौफेर प्रगतीबद्दल सरकारचे अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. बैठकीपूर्वी नितीन नवीन यांनी अटल भवन परिसरात वृक्षारोपण केले.

Goa Traffic Congestion
Goa Politics: 'वाद नको, गोवा रक्षणाचा विचार करा'; तृप्ती बकाल यांचा मनोज परब, अजय खोलकरांना टोला

तुये येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टर लवकरच पेडणे तालुक्यातील तुये येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टर लवकरच कार्यान्वित होणार असून, त्यातून सुमारे दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आणि गृह आधार यांसारख्या योजनांचे लाभ वाढविण्याचा सरकारचा विचार आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी पशुवैद्यकीय, कृषी आणि न्यायवैद्यक विज्ञान अशा नव्या विद्याशाखांशी संबंधित महाविद्यालये सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी योजनांची माहिती पोहोचवावी

सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारची विकासकामे आणि जनहिताच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यावर भाजप भर देणार असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले.

Goa Traffic Congestion
Goa Cyber Fraud: 28 हजार कोटींच्या सायबर घोटाळ्याप्रकरणी मुंबईतील वकिलाला ईडी कोठडी VIDEO

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com