ISL 2026 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

एफसी गोवासमोर मोहम्मेडन स्पोर्टिंगचा अडथळा, ISL फुटबॉल स्पर्धेचा कोलकात्यात सामना; दोन्ही संघ विजयासाठी इच्छुक

FC Goa vs Mohammedan Sporting ISL 2026: एफसी गोवाने मागील लढतीत इंटर काशीविरुद्धच्या बरोबरीसह इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील गुणतक्त्यात भोपळा फोडला, आता त्यांचे लक्ष्य स्पर्धेतील पहिल्या विजयावर आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: एफसी गोवाने मागील लढतीत इंटर काशीविरुद्धच्या बरोबरीसह इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील गुणतक्त्यात भोपळा फोडला, आता त्यांचे लक्ष्य स्पर्धेतील पहिल्या विजयावर आहे, मात्र त्यासाठी त्यांना मोहम्मेडन स्पोर्टिंगचा कठीण अडथळा पार करावा लागेल. सामना शुक्रवारी (ता. २०) कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर खेळला जाईल.

मागील लढतीत फातोर्डा येथे एफसी गोवाने देयान द्राझिच याच्या पेनल्टी गोलमुळे इंटर काशी संघाला १-१ असे गोलबरोबरीत रोखले. त्यामुळे त्यांच्या खाती आता एक गुण आहे. जमशेदपूर येथे मोहम्मेडन स्पोर्टिंगला जमशेदपूर एफसीकडून १-० फरकाने पराभव पत्करावा लागला होता.

भारताचे माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू मेहराजुद्दीन वाडू यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांनी बलाढ्य संघाला चांगलेच झुंजविले होते. एफसी गोवाविरुद्धही त्यांच्याकडून असाच प्रतिकार अपेक्षित आहे. मोहम्मेडन स्पोर्टिंग संघात एकही परदेशी खेळाडू नसून सर्वजण भारतीय आहेत. ‘‘एफसी गोवा दर्जेदार प्रतिस्पर्धी असून त्यांच्याकडून जोरदार आक्रमण अपेक्षित आहे,’’ असे सामन्यापूर्वी वाडू यांनी सांगितले.

स्पॅनिश मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवा संघाला इंटर काशीविरुद्ध मागील लढतीच्या पूर्वार्धात सूर गवसला नव्हता, मात्र उत्तरार्धात वर्चस्व राखत सामन्याची सूत्रे हाती घेतली होती. त्यांनी नवे परदेशी खेळाडू करारबद्ध न करता अगोदरच्या दोघा विदेशींसह भारतीय फुटबॉलपटूंवरच भर दिलेला आहे.

‘‘निश्चितच सामना कठीण असेल. त्यांच्यावर (मोहम्मेडन स्पोर्टिंग) जास्त दबाव नाही, त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतात. आम्हाला मैदानावर दर्जा प्रदर्शित करावा लागेल, तेव्हाच आम्ही विजय प्राप्त करू शकू,’’ असे मार्केझ यांनी नमूद केले. आपला संघ स्पर्धेत निश्चित चांगली कामगिरी करेल हा विश्वास मार्केझ यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

Goa Fishing: मच्छीमारी ट्रॉलर चालणार आता 'हायड्रोजन'वर; डिझेल दरवाढीतून मुक्तता, मासेमारी क्षेत्रात नवे पर्व होणार सुरु

SCROLL FOR NEXT