Goa Fishing: मच्छीमारी ट्रॉलर चालणार आता 'हायड्रोजन'वर; डिझेल दरवाढीतून मुक्तता, मासेमारी क्षेत्रात नवे पर्व होणार सुरु

Hydrogen Fishing Trawlers Goa: डिझेलच्या वाढत्या किमतीपासून मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी हायड्रोजनवर चालणारे मच्छीमारी ट्रॉलर अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa fishing trawler on hydrogen fuelDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिझेलच्या वाढत्या किमतीपासून मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी हायड्रोजनवर चालणारे मच्छीमारी ट्रॉलर अनुदानित दरात उपलब्ध करून देण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. असे ट्रॉलर तयार करणाऱ्या कोचीन शिपयार्ड आणि गोवा ऊर्जा विकास यंत्रणा यांच्यात सामंजस्य करार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

समुद्री वाहतूक आणि मच्छीमारी क्षेत्रात प्रदूषणमुक्त इंधनाचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने गोव्यात मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या बंदरे, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड या देशातील आघाडीच्या जहाजबांधणी संस्थेने तयार केलेल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या नौकेच्या धर्तीवर गोव्यात मच्छीमारी नौका तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa Fishing Ban: कुटबण जेटीवर मासेमारी बंदीबाबत कडक नियम; बोटी-जाळ्यांवर निर्बंध, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

यासाठी गोवा ऊर्जा विकास यंत्रणा आणि कोचीन शिपयार्ड यांच्यात सामंजस्य करार करण्याबाबत प्राथमिक चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजनवर चालणारी प्रवासी नौका तयार करण्याचा मान कोचीन शिपयार्डला मिळाला आहे. वाराणसी येथे अंतर्गत जलमार्ग प्राधिकरणासाठी तयार करण्यात आलेली ही ५० प्रवासी क्षमतेची नौका गेली जवळपास दोन वर्षे यशस्वीपणे सेवेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी २०२४ मध्ये या नौकेचे उद्घाटन करण्यात आले होते. कोचीन शिपयार्डने तयार केलेल्या विद्यमान नौकेत हायड्रोजनवर चालणारी ऊर्जा निर्मिती यंत्रणा, मोठ्या क्षमतेच्या बॅटऱ्या आणि दोन विद्युत मोटारी बसविण्यात आल्या आहेत. ही नौका शांत पाण्यात चांगल्या वेगाने धावू शकते आणि एका दिवसात सुमारे आठ तास कार्यरत राहू शकते. ही नौका हायड्रोजन आणि प्राणवायू यांच्या साहाय्याने वीज निर्माण करणाऱ्या विशेष प्रणालीवर चालते. या प्रक्रियेत धूर किंवा घातक वायू निर्माण होत नाहीत, तर केवळ पाण्याची निर्मिती होते. त्यामुळे ही पद्धत पर्यावरणपूरक मानली जाते.

Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa Fishing Industry: मच्छीमारी व्यवसाय संकटात! परप्रांतीय ट्रॉलर्सचा धुडगूस सुरूच; कारवाईत हवे सातत्‍य

पारंपरिक डिझेलवर चालणाऱ्या नौकांच्या तुलनेत ही यंत्रणा कमी आवाज करते आणि प्रदूषणही अत्यल्प होते. गोव्याच्या किनारपट्टीला अनुरूप नौका गोव्यातील मच्छीमारी क्षेत्रासाठी हरित ऊर्जेवर चालणाऱ्या नौकांचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. वाढता इंधनखर्च, समुद्रातील प्रदूषण आणि पर्यावरणाचे संरक्षण या बाबी लक्षात घेऊन पर्यायी इंधनाचा शोध घेतला जात आहे.

या पार्श्वभूमीवर गोवा ऊर्जा विकास यंत्रणेने कोचीन शिपयार्डशी प्राथमिक चर्चा सुरू केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, गोव्याच्या किनारपट्टीला अनुरूप लहान आणि मध्यम आकाराच्या मच्छीमारी नौका तयार करण्याचा विचार आहे. यामध्ये सुरक्षित इंधन साठवणूक, समुद्रात दीर्घकाळ वापर, कमी आवाज आणि कमी देखभाल खर्च यावर भर दिला जाणार आहे. भविष्यात पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या नौका आणि प्रवासी फेरी सेवांमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर होण्याची शक्यता आहे.

Goa fishing trawler on hydrogen fuel
Goa Illegal Fishing: पकडलेल्या 13 ट्रॉलर्सपैकी 4 पसार, पोलिसांत तक्रार; मालकांवर दंडात्मक कारवाईची तयारी

गोव्यात हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास राज्याच्या हरित ऊर्जा धोरणाला मोठी चालना मिळू शकते. मच्छीमारी आणि समुद्री पर्यटन क्षेत्रात गोवा देशासाठी आदर्श ठरू शकतो, असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गोवा ऊर्जा विकास यंत्रणा आणि कोचीन शिपयार्ड यांच्यातील सामंजस्य कराराबाबत लवकरच अधिकृत हालचाली वेग घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com