पणजी: बंगळूर एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाला नेहमीच सतावले आहे. प्रतिस्पर्ध्यांविरुद्धचा पूर्वेतिहास लक्षात ठेवत, गोव्यातील संघाने आता उत्कृष्ट कामगिरीच्या प्रेरणेसह शुक्रवारी (ता. ६) विजयाच्या पूर्ण तीन गुणांचे लक्ष्य बाळगले आहे. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.
इंटर काशीविरुद्ध सामन्यात खेळ सुरू असताना एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांनी मैदान रेषेवर चेंडू लाथाडला, या कारणास्तव त्यांना रेड कार्ड दाखविण्यात आले होते. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीच्या आढाव्यानंतर गुरुवारी रेड कार्डची शिक्षा स्थगित करण्यात आली असून गौरमांगी शुक्रवारी बंगळूरविरुद्धच्या सामन्यात मैदानावर उपस्थित असतील.
‘‘घरच्या मैदानावर मागील दोन्ही लढतीत आम्हाला बरोबरीवर समाधान मानावे लागले, एकंदरीत कामगिरीची आम्हाला जाणीव आहे. शुक्रवारी आम्ही निश्चितच चांगली कामगिरी प्रदर्शित करू. विजयाचे पूर्ण तीन गुण हेच उद्दिष्ट आहे,’’ असे एफसी गोवाचे साहाय्यक प्रशिक्षक शमील चेम्बकथ म्हणाले.
मैदानात उतरण्यापूर्वी...
एफसी गोवा : ३ सामने, १ विजय, २ बरोबरी, ४ गोल केले, ३ गोल स्वीकारले, ५ गुण
बंगळूर एफसी : ३ सामने, २ विजय, १ बरोबरी, ६ गोल केले, ३ गोल स्वीकारले, ७ गुण
२०२५-२६ मोसमात : ४ एप्रिल २०२६ रोजी फातोर्डा येथे बंगळूर एफसी २-० फरकाने विजयी
एकमेकांविरुद्ध : २२ सामने, बंगळूर एफसी विजयी ९, एफसी गोवा विजयी ७, बरोबरी ६
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.