LA Olympics 2028 Schedule: अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे (LA Olympics 2028) वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या ऑलिम्पिकची सर्वात मोठी बातमी म्हणजे तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचा पुन्हा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक स्पर्धा 14 जुलै ते 30 जुलै 2028 दरम्यान आयोजित केली जाईल. यात एकूण 36 खेळांचा समावेश असेल, ज्यामध्ये 351 विविध स्पर्धा पार पडतील.
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा (Cricket) समावेश झाल्याने, जगभरातील क्रिकेट चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते.
प्रारंभ: लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने 12 जुलै 2028 पासून सुरु होतील.
स्वरुप: पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये T20 (टी-20) फॉरमॅटमध्ये क्रिकेट स्पर्धा खेळवली जाईल.
पदकाच्या लढती: पदकांचे अंतिम सामने 20 जुलै आणि 29 जुलै 2028 रोजी खेळले जातील.
स्थळ: क्रिकेटचे सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे 50 किलोमीटर पूर्वेकडील पोमोना शहरातील फेअरग्राउंड्स स्टेडियममध्ये (Fairgrounds Stadium in Pomona) खेळवले जातील. हे एक तात्पुरते स्टेडियम असेल.
संघ: पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी सहा संघ सहभागी होतील. प्रत्येक संघात 15 खेळाडूंचा समावेश असेल.
सामन्यांचे स्वरुप: स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, बहुतेक दिवशी दोन सामने (Double Headers) खेळले जातील. मात्र, 14 जुलै आणि 21 जुलै रोजी क्रिकेटचे कोणतेही सामने होणार नाहीत.
क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये शेवटचे 1900 मध्ये पॅरिस येथे खेळले गेले होते. त्यानंतर, 128 वर्षांनी या लोकप्रिय खेळाचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागम होत आहे. या समावेशामुळे क्रिकेटला जागतिक स्तरावर आणखी प्रसिद्धी मिळेल आणि नवीन प्रेक्षक मिळतील अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) व्यक्त केली आहे.
भारत (India), ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या अव्वल क्रिकेट खेळणाऱ्या देशांसाठी हे सुवर्णपदक जिंकण्याची एक नवीन संधी असेल. या ऐतिहासिक घटनेमुळे खेळाडू आणि चाहत्यांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशासाठी पदके जिंकण्याची एक नवीन आणि मोठी संधी निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.