Sunil Chhetri match-winning goal Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: FC Goa चे स्वप्न पुन्हा एकदा भंगले! सुनील छेत्रीचे निर्णायक हेडिंग, सरस गोलसरासरीसह बंगळूर अंतिम फेरीत

FC Goa Vs Bangalore FC: एफसी गोवा संघ दोन सामन्यांतील २-२ गोलसरासरीसह इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रयत्न करत होता.

Sameer Panditrao

पणजी: उंचीने कमी असला, तरी सुनील छेत्रीचे हेडिंग खूपच धोकादायक असल्याचे काही महिन्यापूर्वी मानोलो मार्केझ यांनी नमूद केले होते. त्यांनीच गोल करण्याच्या उपयुक्ततेमुळे या हुकमी आघाडीपटूचे वयाच्या ४०व्या वर्षी राष्ट्रीय संघात पुनरामगन करण्यासाठी मन वळविले, मात्र क्लब पातळीवर अनुभवी स्ट्रायकर रविवारी स्पॅनिश मार्गदर्शकासाठी नुकसानकारक ठरला.

एफसी गोवा संघ दोन सामन्यांतील २-२ गोलसरासरीसह इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी प्रयत्न करत होता. काही मिनिटे बाकी असताना भरपाई वेळेत ९०+२ व्या मिनिटास नामग्याल भुतिया याच्या क्रॉस पासवरील ५५ व्या मिनिटास मैदानात उतरलेल्या छेत्रीचे झेपावत हेडिंग भेदक ठरले आणि फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल स्टेडियमवर मोठ्या संख्येने जमलेले एफसी गोवाचे पाठिराखे आणि संघाचेही स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

एफसी गोवाने सामना २-१ फरकाने जिंकला खरा, पण पहिल्या टप्प्यात २ एप्रिल बंगळूर एफसीने २-० असा विजय मिळविला होता. एकंदरीत ३-२ सरस गोलसरासरीसह गेरार्ड झारागोझा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आयएसएल करंडकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला. एफसी गोवाचे सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले. २०१८-१९ मध्ये अंतिम फेरीत एफसी गोवालाच हरवून आयएसएल करंडक पटकावलेल्या बंगळूर एफसीने एकंदरीत चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली.

दोन गोलची पिछाडी भरून काढताना एफसी गोवाने झुंझार खेळ करत बंगळूरला सातत्याने दबावाखाली ठेवले, पण काही संधी हुकल्या, तसेच बंगळूरचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू दक्ष राहिला. विश्रांतीनंतर चौथ्या मिनिटास थेट फ्रीकिक फटक्यावर बोर्हा हेर्रेरा याने अफलातून गोल केला. ६०व्या मिनिटास देयान द्राझिच याच्या गोलमुळे एफसी गोवा संघ आणि चाहते जल्लोष करण्यास सुरवात करत असतानाच ऑफ-साईड गोलची खूण झाली आणि उत्साहावर विरजण पडले.

संघाचे आक्रमण अधिक धारदार करण्याच्या उद्देशाने मार्केझ यांनी कर्णधार-बचावपटू ओडेई ओनाइंडिया याला माघारी बोलावत ७५व्या मिनिटास आर्मांदो सादिकू याला संधी दिली. त्याने विश्वास सार्थ ठरविताना सामन्यातील दोन मिनिटे बाकी असताना आकाश संगवानच्या शानदार असिस्टवर सादिकूचे हेडिंग अचूक ठरले आणि एफसी गोवाचे आव्हान पुन्हा जिवंत झाले. भरपाई वेळेत छेत्रीने यंदा स्पर्धेतील २७व्या सामन्यातील १४ वा गोल नोंदवत बंगळूर एफसीची आगेकूच कायम राखली. त्यांच्यासमोर येत्या १२ एप्रिल रोजी जमशेदपूर एफसी व मोहन बागान यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल.

एफसी गोवा एकूण ८ वेळा प्ले-ऑफ फेरीत, ६ वेळा पराभूत

२०१४ ः पराभूत विरुद्ध एटीके ः कोलकात्यात ०-०, गोव्यात ०-०, पेनल्टींवर एटीके ४-२

२०१५ ः विजयी विरुद्ध दिल्ली डायनॅमोज ः दिल्लीत ०-१, गोव्यात ३-०, गोलसरासरी ३-१

२०१७-१८ ः पराभूत विरुद्ध चेन्नईयीन एफसी ः गोव्यात १-१, चेन्नईत ०-३, गोलसरासरी १-४

२०१८-१९ ः विजयी विरुद्ध मुंबई सिटी ः मुंबईत ५-१, गोव्यात ०-१, गोलसरासरी ५-२

२०१९-२० ः पराभूत विरुद्ध चेन्नईयीन एफसी ः चेन्नईत १-४, गोव्यात ४-२, गोलसरासरी ५-६

२०२०-२१ ः पराभूत विरुद्ध मुंबई सिटी ः २-२ व ०-०, पेनल्टींवर मुंबई सिटी ५-६ (दोन्ही लढती गोव्यात)

२०२३-२४ ः उपांत्य फेरी (प्ले-ऑफ) ः पराभूत विरुद्ध मुंबई सिटी ः फातोर्डा येथे २-३, मुंबई येथे ०-२, गोलसरासरी २-५

२०२४-२५ ः उपांत्य फेरी (प्ले-ऑफ) ः पराभूत विरुद्ध बंगळूर एफसी ः बंगळूर येथे ०-२, फातोर्डा येथे २-१, गोलसरासरी २-३

संकलन ः किशोर पेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

SCROLL FOR NEXT