Vijaya Mehta Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

नाट्यसृष्टीचा चालता बोलता शब्दकोश 'विजयाबाई'

Vijaya Mehta: प्रख्यात रंगकर्मी, दिग्दर्शिका विजया मेहता नुकत्याच निवर्तल्या. विजयाबाई म्हणजे मराठी नाट्यसृष्टीचा चालता बोलता शब्दकोश

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

मी पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकताना आमचा नाट्यग्रुप होता. प्रा. भालबा केळकर हे दिग्दर्शक. एका प्रयोगाला विजयाबाईंना पाहुणे म्हणून बोलाविले होते. त्यांनी दिलेल्या टिप्स हा नाट्यकलेतील त्यांच्या प्रभुत्वाचा प्रत्यय येत होता.

प्रख्यात रंगकर्मी, दिग्दर्शिका विजया मेहता नुकत्याच निवर्तल्या. विजयाबाई म्हणजे मराठी नाट्यसृष्टीचा चालता बोलता शब्दकोश. नाट्यसृष्टीचे सर्व कंगोरे हाताळलेल्या अशा या महान विदुषी. हमिदाबाईची कोठी हे विजया बाईंनी दिग्दर्शित केलेले ७०-८० च्या दशकातील अत्यंत गाजलेले नाटक.

अशोक सराफ, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांसारख्या दिग्गज कलाकारांचा उदय या नाटकामुळेच झाला. खास करून सराफ यांचा लुक्का दादा तर त्या काळात जबरदस्त लोकप्रिय झाला होता. त्याप्रमाणे बॅरिस्टर हेही त्यांचे अत्यंत लोकप्रिय नाटक. सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांचे त्यावेळी वादग्रस्त ठरलेले नाटकही विजयाबाईंच्या पोतडीतलेच.

विजयाबाई या खरेतर समांतर नाटकाच्या चळवळीतल्या. नाटककार विजय तेंडुलकर, दिग्दर्शक अरविंद देशपांडे व दिग्गज अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांना घेऊन त्यांनी रंगायन संस्थेची निर्मिती केली होती. या संस्थेचे उद्दिष्टही हेच होते. त्यामुळेच विजयाबाई नाटक दिग्दर्शित करताना बारीक बारीक तपशीलावरही ध्यान देत असत. मी पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना आम्हा विद्यार्थ्यांचा एक नाट्यग्रुप होता. प्रा. भालबा केळकर हे आमचे दिग्दर्शक.

एका नाट्यप्रयोगाला आम्ही विजयाबाईंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले होते. त्यावेळी त्यांनी आम्हाला ज्या टिप्स दिल्या त्या आजही लक्षात आहेत. नाट्यकलेतील प्रत्येक अंगावर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वाचा प्रत्यय त्या ‘टिप्स’ मधून येत होता. त्यानंतर मी त्यांची अनेक नाटके पाहिली. पण मर्मबंधातील ठेव बनले ते ‘संध्याछाया’ नाटक. संपूर्ण नाटक एका वृद्ध जोडप्यावर असल्यामुळे या भूमिका करणे म्हणजे एक आव्हानच होते.

नंतर अनेक संचात मी हे नाटक पाहिले. पण एकाही संचाला तो वाटवे-विजयाबाईंचा ठसा पुसता आला नाही. रावसाहेब व पेस्टनजी हे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट ‘ऑफ बीट’ होते. चित्रपट भलेही न गाजू देत, पण त्यांच्या ‘पार्टी’ व ‘रावसाहेब’मधील भूमिका पुरस्कार प्राप्त ठरल्या होत्या हेही तेवढीच खरे. विजयाबाईंनी अनेक कलाकार घडवले.

सुकन्या मोने, अशोक सराफ, नाना पाटेकर सारखे मोठे कलाकार त्यांचे हे ऋण आजही मान्य करतात. म्हणूनच तर त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी पोरकी झाल्यासारखी वाटू लागली आहे. अशा या रंगभूमीवर सर्वांगाने आपला शिक्का जमवून प्रेक्षकांना एक वेगळ्या अनुभूतीचा प्रत्यय आणून देणाऱ्या या महान कलाकारांच्या स्मृतीना भावपूर्ण आदरांजली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT