
Satyajit Ray Excellence In Cinema Award IFFI Goa 2024 Closing Ceremony
बांबोळी: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिला जाणारा मानाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक फिलिप नॉयस यांना प्रदान करण्यात आला आहे. फिलिप नॉयस यांना चित्रपट क्षेत्रामधील योगदानासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आठ दिवसीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक शेखर कपूर व्यासपीठावर उपस्थित होते.
फिलिप नॉयस यांनी अलाईव्ह डे, बल्डस्पोर्ट्, फर्स्ट वॉरियर, किलर १०, पोचर, द फॉल या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
Lampan wins the Best Web Series (OTT) Award at the 55th International Film Festival of India
यावेळी लंपन या ओटीटी वरील वेबसिरिजला उत्कृष्ट वेबसिरिजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय ग्रामीण जीवनावर आधारीत या चित्रपटात एक लहान मुलाच्या मानसिक आणि सामाजिक बदलाचे चित्रण करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.