Dr Ketan Bhatikar Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

केतन भाटीकरांच्या निधनानंतरचे बारा दिवस..

Dr Ketan Bhatikar: फोंड्याचे समाज कार्यकर्ते तथा कॉंग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचे निधन होऊन आज (२६ रोजी) बारा दिवस होत आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मिलिंद म्हाडगुत

फोंड्याचे समाज कार्यकर्ते तथा कॉंग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचे निधन होऊन आज (२६ रोजी) बारा दिवस होत आहेत. तसे पाहायला गेल्यास राजकीयदृष्ट्या भाटीकर कोणच नव्हते. ना आमदार, ना मंत्री,ना नगरसेवक वा पंच, ना एखाद्या पक्षाचा पदाधिकारी. पण असे असूनसुद्धा त्यांनी फोंड्यात आपले असे स्थान निर्माण केले होते. आणि त्याचे प्रमुख कारण होते ते म्हणजे त्यांची समाजसेवा!

कोणत्याही वेळेला धावून येणारा देवदूत म्हणून त्यांची ख्याती झाली होती. आणि त्यामुळेच त्यांच्या आकस्मिक व अकाली निधनाच्या धक्क्यातून फोंड्यातील अनेक नागरिक अजूनही सावरलेले दिसत नाहीत. परवा फोंडा इथे झालेल्या त्यांच्या शोकसभेत याचा प्रत्यय आला. त्यांची आठवण काढताना अनेक जणांना आपल्या भावना आवरणे कठीण जात होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्याकरता तर गर्दीचा महापूरच लोटला होता. त्यावेळचे असंख्य लोकांचे भांबावलेले चेहरे तर बरेच काही सांगून जात होते.

भाषा सुरक्षा मंच ते मगो आणि आता मगो ते कॉंग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास असला तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र त्यांच्यापासून दुरावलेले नव्हते. रद्द झालेली फोंड्यातील पोटनिवडणूक हाही तसा त्यांना धक्काच होता. पण म्हणून ते थांबले नव्हते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना ते कोणालाही शिंगावर घ्यायला कचरत नसत. २०२३च्या डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्यांच्या घरी आले तेव्हा मी तिथे होतो. त्यावेळी त्यांनी वाचलेला फोंड्यातील समस्यांचा पाढा ऐकून मुख्यमंत्रीसुद्धा थक्क झाले होते.

समस्यांना हात घालणे, लोकांच्या मदतीला धावून जाणे हेच त्यांचे जीवन झाल्यासारखे वाटत होते. याच त्यांच्या डॅशिंग वृत्तीमुळे अनेक युवक त्यांचे फॉलोअर्स बनले होते. म्हणूनच तर गेले बारा दिवस फोंड्यात एकच विषय चर्चिला जात आहे आणि तो म्हणजे भाटीकरांचा आकस्मिक झालेला मृत्यू. या चर्चेला अनेक कंगोरे असले तरी त्यातून भाटीकरांच्या निधनामुळे हरवलेला त्यांचा आधार, निर्माण झालेली पोकळी मात्र अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.

आता त्यांच्या कार्यकर्त्यांचे काय, हाही प्रश्‍न पटलावर यायला लागला आहे. कार्यकर्ते हीच भाटीकरांची खरी शक्ती होती. याच शक्तीच्या जोरावर त्यांनी एकट्याने मोठ्या मोठ्या राजकीय ’हस्तीं’शी सामना केला होता. आता त्यांचे कार्यकर्ते कै. भाटीकराना पर्याय शोधत असले तरी सध्या त्यांचा पर्याय होऊ शकेल अशी एकही व्यक्ती फोंड्यात तरी दिसत नाही. त्यामुळे आता त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला भाटीकर समजून त्यांच्या पाऊलखुणावर चालत त्यांनी आपल्या जीवनात घेतलेला वसा पूर्ण करण्याचे बघितले पाहिजे. मला वाटते तीच या समाजसेवेचा वस्तुपाठ निर्माण केलेल्या अतुलनीय नेत्याला खऱ्या अर्थी श्रद्धांजली ठरू शकेल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT