Partagali Math Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

अग्रलेख: मठ सर्व समाज एकीकरणाचे प्रतीक आहे, हाच संदेश श्रीरामाची भव्य मूर्ती देईल; सांस्कृतिक पुनरुत्थानाची पुरोमागी दिशा

Partagali Math Goa: समाज विकसित, प्रगत व्हायचा असेल तर त्याला आवश्यक असलेली आध्यात्मिक बैठक सरकार घालू शकत नाही. ते कार्य मठांनी, मंदिरांनीच हाती घ्यावे लागेल.

गोमन्तक डिजिटल टीम

मठ वा धार्मिक हेतूने निर्माण केलेल्या स्थळांमधून कर्मकांडांना प्रोत्साहन आणि प्रतिगामित्वाला चालना मिळते, असे सरसकट गृहीतक होऊ शकत नाही, हे पर्तगाळ मठात झालेल्या श्रीराम मूर्ती अनावरण कार्यक्रमातून उद्घृत झाले, जे खचितच आश्‍चर्य ठरावे. निकोप संस्कृतीची मुळे घट्ट धरून ठेवत अवकाशाला गवसणी घालणे म्हणजे पुरोगामी होणे आहे. धार्मिक प्रतीकांवर चढलेली पुटे बाजूला केल्यास आजही त्याचा प्रभाव विनियोग समजाच्या भल्यासाठी करता येणे शक्य आहे.

जे ज्ञानाने होते, तेच भक्तीने करणेही शक्य आहे. समस्तांचे कल्याण हा हेतू असेल तर त्यापासून मठ-मंदिरे तरी वंचित का राहावीत? त्यांना प्रतिगामी सदरात ढकलल्याने, केवळ संशयाच्या नजरेने पाहिल्याने समाजसुधारणा होणार नाही. परंपरेच्या राजमार्गावरून आधुनिकतेचे लक्ष्य गाठण्याची ऊर्जा देणारे पर्तगाळ केंद्र आधुनिक गोव्यातील महत्तम स्थान असल्‍याचे पंतप्रधानांचे बोल प्रेरणादायी ठरावे. मोदींनी मठस्थावरून नऊ संकल्पांचे आवाहन केले, जे केवळ नागरिकच नव्हे तर राजसत्तेला दिशा देणारे आहे.

दुर्दैवाने आजपर्यंत अनुभव असा आहे- जे मोदी सांगतात त्याच्या विपरीत कृती त्यांचे अनुसरण करण्याच्या आवया उठवणारे करतात. पर्यावरण रक्षण करा, तोच धर्म समजा; स्वच्छता अंगीकारा; स्वदेशीचा पुरस्कार; देशदर्शन; सेंद्रिय शेतीला चालना; आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा; योग आणि खेळाचा अंतर्भाव ठेवा; गरिबांचे जीवनमान उंचावा, गरीब कुटुंब दत्तक घ्या ही सूत्री आचरणात येणार का? गोवा केवळ समुद्र पर्यटनापुरता मर्यादित नाही.

मनाला शांती देणारी धार्मिक स्थळे विकसित होत आहेत हे सुचिन्ह आहे. पर्तगाळ मठाच्‍या पंचशताब्‍दीनिमित्त ७७ फुटी श्रीराम मूर्तीच्या अनावरणानिमित्ताने झालेल्‍या स्वामींच्‍या आशीर्वचनात, पंतप्रधान मोदी यांच्‍या संबोधनात परंपरेची मुळे घट्ट करून वैश्‍विक झेप घेण्याची उमेद आणि इच्छाशक्तीमध्ये पुरोमागी दिशा होती. समाजाला एकसंध करण्याचे ध्येय त्यात होते. ही सकारात्मकता कृतीत दिसावी. मठ सर्व समाज एकीकरणाचे प्रतीक आहे, हाच संदेश श्रीरामाची भव्य मूर्ती देईल, हा विश्‍वास सार्थ ठरावा.

पर्तगाळ मठ भागातील ‘रामायण थीम पार्क’ पर्यटनाद्वारे अध्यात्माला चालना देण्यास उपयोगी ठरेल. सर्वसमावेशक हिंदू संकल्पनेला बळकटी देणाऱ्या रामरूपी प्रतीकाचे राजकीय हरण झाले; त्याच्या छटा कार्यक्रमात दिसल्याही; परंतु श्रीरामाची मूर्ती गोव्यात एकतेचे इंद्रधनू उंचावेल, यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. गोव्‍यात कोटीतीर्थसारख्या उपक्रमांतून एकतेला चालना मिळणार असल्यास त्याचे स्वागत होईल.

श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामी यांनी आशीर्वचनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘धर्मपुत्र’ संबोधून कार्याचे कौतुक केले. महाभारतातील दुर्योधन व युधिष्ठिराची लीलया उदाहरणे देत जगतकल्याण करणाऱ्या श्रीकृष्णाचे रूपक देत मोदींचा केलेला गौरव शीर्ष नेत्याला प्रेरणादायी होता. मोदी आणि गोवा, त्यांच्या मातेला केलेले नमन शब्दातीत होते, स्वामींनी जागतिक आयामाचे दर्शन घडवून उपस्थितांना स्थंभित केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अवघ्या काही मिनिटांत खड्या भाषण शैलीचा परिचय देत अध्यात्मापासून विकासाचे केलेले निरूपण लाघवी होते.

पण, त्यासोबत ओघाने आलेले राजकीय स्‍फूरण तटस्थ जनांना रुचणार नाही. पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा गोव्यात येतात तेव्हा चैतन्याची लाट येते. पर्तगाळला त्याची अनुभूती आली, असे म्‍हणता येईल. त्यांनी सांस्कृतिक आव्हाने भेदून मठाने एकता जपण्याचे केलेले कार्य विषद केले. एकतेमधूनच राष्ट्र समृद्ध होते. समाज विकसित, प्रगत व्हायचा असेल तर त्याला आवश्यक असलेली आध्यात्मिक बैठक सरकार घालू शकत नाही.

ते कार्य मठांनी, मंदिरांनीच हाती घ्यावे लागेल. ‘कसे जगायचे?’ याचे उत्तर असलेली भौतिक व्यवस्था, प्रगती जशी आवश्यक आहे, तसेच ‘का जगायचे?’ याचे उत्तर असलेले आध्यात्मिक अधिष्ठानही तितकेच महत्त्वाचे आहे. आज वाढत्या आत्महत्या, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बलात्कार यांची बजबजपुरी माजण्याचे एक कारण- समाजापासून दूर झालेली आध्यात्मिक बैठक, असाही एक मतप्रवाह आहे.

केवळ आध्यात्मिक बैठक असेल तर भौतिक प्रगती होणार नाही, जागतिक स्पर्धेत टिकाव लागणार नाही. या दोन्हींची सुयोग्य सांगड घातल्यास फार मागे राहण्याची भीती नाही आणि फार पुढे जाण्याचा धोकाही उरत नाही. समाजाचे हे संतुलन ठेवण्याचे सामर्थ्य सांस्कृतिक केंद्रांत आहे. ते सदोदित परावर्तित होत राहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Fishing: 'बोट्स माझ्या नावावर नाहीत!' आमदार नाईक आक्रमक, सीझ ट्रॉलर्सच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, ''माफी मागा!''

IND VS SA Head to Head: 94 एकदिवसीय सामने... भारत- आफ्रिकामध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडमध्ये कोणाची आकडेवारी भारी?

Mahatma Jyotirao Phule: 1869 साली छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला गेला; समाजक्रांतीचे अग्रदूत महात्मा फुले

Goa Live News: भाजप उमेदवारांची यादी लवकरच! मगोप सोबत जागावाटपावर चर्चा सुरू: दामू नाईक

Panaji Air Quality: धोक्याची घंटा! राजधानीची हवा झाली 'असुरक्षित'; नोव्हेंबर महिन्यात पणजीचा AQI 176 वर

SCROLL FOR NEXT