narkasur goa  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Narkasur: श्रीकृष्णाऐवजी 'नरकासुराचाच' उदो उदो का होतोय?

Narkasur Goa: गोव्यात नरकासुर दहनप्रथा पूर्वीपासून आहे. माझ्या लहानपणी ही प्रथा खूप छोट्या स्वरूपात होती; मात्र हल्ली याला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात नरकासुर दहनप्रथा पूर्वीपासून आहे. माझ्या लहानपणी ही प्रथा खूप छोट्या स्वरूपात होती; मात्र हल्ली याला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. हल्ली दिवाळीच्या निमित्ताने श्रीकृष्णाऐवजी नरकासुराचाच उदो उदो केला जात असतो.

नरकासुर दहन प्रथेमुळे तरुणामध्ये व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे असेही निदर्शनास येते. मद्याचे व्यसन लागल्याने ऐन तरुण वयात जीवन संपवलेली अनेक उदाहरणे मी पाहिलेली आहेत. मद्यप्राशन करून दिवाळीच्या पूर्वसंध्येला बेधुंदपणे वाहन चालवल्याने तर अनेक अपघात घडत असतात.

दिवाळीच्या कित्येक दिवस अगोदर मुले नरकासुराची प्रतिमा बनवण्याच्या तयारीला लागतात आणि यामुळे सहामाही परीक्षेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असते. मुलाचे करियर महत्त्वाचे असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कसे चालणार?

तसेच नरकासुराच्या प्रतिमा ज्या प्रकारे मोठ्या भव्य बनवल्या जातात त्यातून त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असते. नरकासुराची प्रतिमा बनवून, ती रस्त्यावर आणून रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांकडून बालगोपाळ पैशांची मागणी करतात.

हा प्रकारही खटकणारा असतो. पैसे न दिल्यास शिवीगाळ करणे वगैरे प्रकारही घडलेले आहेत. या जमलेल्या पैशांचा पुढे दुरुपयोगही केला जातो. कोवळ्या मुलांवर यामुळे कोणते संस्कार होणार आहेत? याचा विचार झाला पाहिजे.

कलेची जोपासना ही झालीच पाहिजे; मात्र त्यामुळे आसुरी प्रवृत्ती बळावणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे. नकारात्मकतेचा उदो उदो झाल्यास त्याचे निश्चितच नकारात्मक परिणाम समाजावर होणार आहेत.

गोव्यात हल्ली अनेक ठिकाणी दीपावलीच्या पूर्वसंध्येला श्रीकृष्ण मिरवणुका काढल्या जाऊ लागल्या आहेत.

तसेच यंदा प्रथमच अखिल गोमंतक शिवप्रेमी संघटनेने दीपावलीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय ‘किल्ले बनवा स्पर्धे’चे आयोजन केले आहे. शौर्यजागृतीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे. ही एक चांगली बाब आहे. दीपावलीच्या निमित्ताने नरकासुराचा उदो उदो करण्याऐवजी आपण श्रीकृष्ण भक्ती वाढवल्यास समाजातील नकारात्मकता मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास हातभार लागेल.

अभिजीत नाडकर्णी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT