Goa Narkasur: नरकासूराचे कर्णकर्कश डीजे संगीत! पणजीत नियमांना तिलांजली; ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप

Narkasur Noise Pollution: ध्वनिप्रदूषण होते की नाही, हे मोजण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात असलेले एकमेव ध्वनिमापक यंत्र अपुरे पडत असल्याचे काल (30 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा दिसून आले.
Goa Narkasur: नरकासूराचे कर्णकर्कश डीजे संगीत! पणजीत नियमांना तिलांजली; जेष्ठ नागरिकांना मनस्ताप
Narkasur Noise PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Diwali 2024 Narkasur Noise Pollution

पणजी: ध्वनिप्रदूषण होते की नाही, हे मोजण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात असलेले एकमेव ध्वनिमापक यंत्र अपुरे पडत असल्याचे काल (30 ऑक्टोबर) सायंकाळी उशिरा दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यास असलेली बंदीही कुठच्या कुठे हरवली होती, असे भयाण चित्रही ठळक झाले होते. नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला नरकासुर पाहण्यासाठी मोठी गर्दी लोटली असली तरी कानठळ्या बसविणाऱ्या संगीताला प्रत्येकाला सामोरे जावे लागले.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल आणि पोलिस या खात्यांमध्ये कारवाई कोणी करावी, यावरून एकमेकांकडे बोटे दाखविणे सुरू झाल्याने प्रत्‍यक्षात ध्वनिप्रदूषण कसे असते, याचा जीवंत अनुभव नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांनी बुधवारी घेतला.

Goa Narkasur: नरकासूराचे कर्णकर्कश डीजे संगीत! पणजीत नियमांना तिलांजली; जेष्ठ नागरिकांना मनस्ताप
Goa Narkasur: नरकासुर मिरवणुकीचा आवाज मर्यादेत ठेवा!! आवाजावर असणार पोलिसांची करडी नजर

सांतिनेज येथील एका नागरिकाने राज्य मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितल्यानंतर राज्यभरातील संगीतावर नियंत्रण येईल, असे वाटत होते. निवासी क्षेत्रातील ६० डेसिबल्सची मर्यादा केव्हाच ओलांडली गेली होती. बहुतांश नरकासुर प्रतिमा करण्यासाठी राजकारणी पुरस्कर्ते होते. नरकासुर बनविणाऱ्यांना आपल्यामागे भक्कम राजकीय पाठिंबा आहे, याची जाणीव असल्यानेच त्यांनी कायद्याला वाकुल्या दाखविणे सुरू केले होते. ध्वनी नियंत्रणावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी कायद्याने उपजिल्हाधिकाऱ्यांवर दिली आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने वर्तमानपत्रांतून जाहिरात प्रसिद्ध करून नागरिकांनी आवाजाचा त्रास होत असल्यास पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन दोनच दिवसांपूर्वी केले होते.

Goa Narkasur: नरकासूराचे कर्णकर्कश डीजे संगीत! पणजीत नियमांना तिलांजली; जेष्ठ नागरिकांना मनस्ताप
Goa Narkasur: 15 बॉक्स बिअर आणि चार हजार कॅश! गोव्यात नरकासूर स्पर्धेनिमित्त विचित्र बक्षीस

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्तर व दक्षिण गोव्यात ध्वनिमापन करणारी फिरती पथके तैनात ठेवल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील यांनी दिली. ते म्हणाले, किनारी भागातील ध्वनिमापन करण्याची यंत्रणा मंडळाने बसविली आहे आणि मंडळाच्या नियंत्रण कक्षाशी ती संलग्न आहे.

सरकारी खात्यांचे एकमेकांकडे बोट

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश पाटील म्हणाले की, नरकासुर प्रतिमा प्रदर्शनावेळी होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक वाड्यावर मंडळ पोचू शकत नाही. उपजिल्हाधिकारी कार्यालयाने त्यावर लक्ष ठेवावे. पोलिसांना ध्वनिमापन यंत्रे दिली आहेत. मध्यरात्रीनंतर संगीत वाजवल्यास ते बंद करण्यास पोलिसांना काहीच हरकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com