Mandovi River Bridges Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Mandovi River Bridges: दळणवळणाचा अभाव अन् विकासाची रोखलेली वाट

North Goa Connectivity: उत्तर गोव्यातील मांडवी नदीचे विविध फाटे साखळी, विर्डी, कारापूर, सर्वण, कुडणे आणि आमोणे या गावांतून वाहतात.

दैनिक गोमन्तक डिजिटल

सौ. प्रशिला नाईक ,सौ. पवित्रा गावकर

उत्तर गोव्यातील मांडवी नदीचे विविध फाटे साखळी, विर्डी, कारापूर, सर्वण, कुडणे आणि आमोणे या गावांतून वाहतात. या नदीमुळे अनेक गावांमध्ये नैसर्गिक जवळीक असूनही दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आहे. काही गावांतील नागरिकांना जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक किलोमीटरचा वळसा घ्यावा लागतो.

आमोणे-विर्डी पूल व जोडरस्ता २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात पूर्ण झाल्याने या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, कारापूर-विर्डी पूल आणि कुडणे-विर्डी जोडणी अद्याप प्रलंबित आहे. कारापूरमधून विर्डीला जाण्यासाठी सध्या साखळीमार्गे सुमारे १३ किलोमीटर अंतर कापावे लागते. हा पूल झाल्यास हे अंतर अवघ्या काहीशे मीटरवर येणार आहे.

सारमानस-आमोणे खाडीची रुंदी कमी असतानाही पूल नसल्यामुळे नागरिकांना माशेल-खांडोळा किंवा डिचोली-साखळीमार्गे मोठा प्रवास करावा लागतो. कुडणे आणि विर्डी ही गावे एकमेकांच्या अगदी जवळ असूनही नदीच्या फाट्यामुळे नागरिकांना सुमारे ७ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. येथे छोट्या पुलाची आवश्यकता आहे.

कारापूर-साखळी भागात यापूर्वीही पुलांनी गावांना जोडण्याचे काम केले आहे. १९२९ च्या सुमारास साखळी किल्ला ते कारापूर दरम्यान पहिला पूल बांधण्यात आला. त्यानंतर १९५५ मध्ये दत्तमंदिर ते कारापूर विठ्ठल मंदिर असा पूल उभारण्यात आला. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे सध्याच्या सुविधांवर ताण वाढला आहे.

साखळी मतदारसंघातील नार्वे, पिळगाव, कारापूर, सर्वण, विर्डी, कुडणे, न्हावेली, मायणा आणि आमोणे या गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवीन पूल, रस्ते आणि रोजगारनिर्मिती प्रकल्पांची गरज आहे. दळणवळण ही विकासाची कणा असून, पुलांमुळे केवळ अंतर कमी होत नाही तर गावांमधील सामाजिक आणि आर्थिक संबंधही अधिक मजबूत होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT