

पणजी: मांडवी नदीतील जंतूजन्य प्रदूषण चिंताजनक पातळीवर असल्याचे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंतरिम अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या तपासणीत नदीतील अनेक ठिकाणी फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले असून, हा अहवाल बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मांडवी नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. विशेषतः कॅसिनो असलेल्या भागाजवळील पाणी आणि इफ्फी जेटीपासून मांडवी पुलापर्यंतच्या भागातील पाण्याची गुणवत्ताही मंडळाने तपासली आहे. ही तपासणी २२ मे आणि ११ जून या दोन दिवशी करण्यात आली. दोन्ही दिवशी भरती आणि ओहोटीच्या वेळी नमुने घेण्यात आले.
एकूण १८ ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये पाण्याचा आम्ल-क्षार गुणधर्म, गढूळपणा, विरघळलेला प्राणवायू, जैविक घाण, नायट्रेट, नायट्राइट आणि जंतूंचे प्रमाण तपासण्यात आले. काही नमुने कॅसिनो परिसराजवळ, तर काही नदीच्या मध्यभागात घेण्यात आले. तपासणीत पाण्याचा आम्ल-क्षार गुणधर्म ७.५० ते ८.०८ दरम्यान पान १० वर
सांडपाणी व्यवस्थापन
अहवालात कॅसिनोंमधील सांडपाणी टाक्यांत साठवून ते नौकांद्वारे पाटो येथील शुद्धीकरण केंद्रापर्यंत नेले जात असल्याचे म्हटले आहे. या प्रक्रियेवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखरेख ठेवतात, अशी नोंदही अहवालात आहे. पाटो येथील शुद्धीकरण केंद्राच्या तपासणीत काही निकष निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.