Chandrapur aka Chandor History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

कदंब साम्राज्याचा रक्तरंजित अंत! 52 जहाजांचा ताफा अन् राजपुत्राचा विश्वासघात; गोव्याच्या इतिहासातील 'ती' काळी रात्र

Chandrapur aka Chandor History: कदंब कुटुंबातील परंपरेनुसार तिला परत आणण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला आणि ती घाईघाईने १८ ऑक्टोबर १३४५ रोजी चंद्रपुर येथे पोहोचली.

गोमंतक ऑनलाईन टीम

सर्वेश बोरकर

नवायाथ’ हा एक भारतीय मुस्लीम समुदाय आणि कोकणी मुस्लिमांचा एक उपसमूह जो नवाठी भाषा बोलतो व ज्याचा मूळ आधार कोकणी भाषा हीच होती. वेगवेगळ्या लेखकांनी नवायाथ या शब्दाचे वेगवेगळे अर्थ दिले आहेत. नवायाथ हे प्रामुख्याने येमेन आणि पर्शियातील स्थलांतरित, ज्यांनी भारतातील दुसऱ्या व्यापारी समुदायाशी म्हणजेच कोकणी लोकांशी १,००० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारल्यामुळे एक नवीन जातिव्यवस्था उदयास आली, कारण हे लोक नवायाथ समुदायातच लग्न करत.

सादतुल्ला खान पहिला, हा त्यातलाच एक नवायात कोकणी मुस्लीम जो मुघल साम्राज्याखाली कर्नाटकचा नवाब होता. तसेच सुलतान हसन आणि सुलतान जमालुद्दीन नखुदा हे नवायात समुदायाचे नाविक आणि अरबी व्यापारी वंशज मानले जातात. भारतीय इतिहासकार ओमर खालिद म्हणतात की नवायाथ भारतीय मुस्लिमांच्या तीन गटांपैकी एक ज्यांनी नवायाथ नाव वापरले आहे. या गटांचे मूळ ओमान, पर्शियन आखात म्हणजे इराण आणि इराक प्रदेशात सामान्य आहे, जिथे ते नाविक आणि व्यापारी होते. त्यातलाच एक गट प्रामुख्याने कर्नाटकातील भटकळ, मानकी, टोंसे, मालपे, शिरूर, गंगोली, सागर, कुमटा आणि मुर्डेश्वर गावात आहे, तर दुसरा तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये आढळतो. तिसरा गट आज सामान्यत: कोकणी मुस्लीम म्हणून ओळखला जातो. ते ज्या प्रदेशात राहतात त्या प्रदेशावरून ओळखले जातात.

मोरोक्कोचा अरब प्रवासी व इतिहासकार इब्न -ए- बत्तूताच्या कथेनुसार, सुलतान जमालुद्दीन नखुदाच्या वडिलांनी सिंदपूर म्हणजेच चंद्रपुर जिंकल्यानंतर बगदादच्या मशिदीसारखी एक मोठी मशिदी बांधली आणि एक शहर स्थापन केले. हसन नखुदा यांनी गोव्यातील कदंबांच्या कारकिर्दीत राज्यपाल म्हणून काम केले असावे, जसे ११व्या शतकात अरबस्तानच्या मुहम्मदचा मुलगा साधम (सद्दाम ) नावाचा मुस्लीम राज्यपाल होता. सुलतान मालुद्दीन मुहम्मद त्याच्या धार्मिक कर्तव्यांबद्दल निष्ठावान होता आणि कर्नाटकाच्या किनाऱ्यावरील शक्तिशाली शासकांपैकी एक होता. त्याच्या सागरी सामर्थ्यामुळे मलबार व दक्षिणेस कोकणातील भागात त्याचे शासन चाले.

होयसळ राजा वीर बल्लाळ तिसरा याने १३३८मध्ये, सुलतान जमालुद्दीनच्या आक्रमक कारवाया रोखण्यासाठी बारकुर येथे आपले सैन्य तैनात केले; जो वीर बल्लाळ तिसरा याचा मेहुणा दास अलुपा राजा याला उलथवून टाकण्याची धमकी देत होता. सुलतान जमालुद्दीन नखुदाच्या गोव्याच्या चंद्रपूरवर आक्रमण करून काबीज करण्याच्या योजनेअंतर्गत १३४३मध्ये, चंद्रपूर राजाच्या मुलाचा संदेश मिळाल्यावर ५२ जहाजांचा ताफा रवाना केला होता, ज्यामुळे चंद्रपूर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, १३४४मध्ये, चंद्रपुरच्या राजाने अचानक हल्ला केला, तर सुलतानची सेना संपूर्ण प्रदेशात विखुरली गेली. या संघर्षाच्या परिणामाची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

गोव्यातील (Goa) कदंब इतिहासाच्या शेवटच्या दिवसांचा आढावा चौदाव्या शतकातील मोरोक्कोचा अरब प्रवासी व इतिहासकार इब्न बत्तूता ( १३०४-१३७७), त्याच्या इतिहास पुस्तकांत नोंदवतात की कौटुंबिक कलहामुळे १३४४मध्ये होनावरचा नवाब जमालुद्दीन याला गोव्यावर आक्रमण करण्यास आमंत्रित केले गेले. हे स्पष्ट करताना मोरोक्कोचा अरब प्रवासी व इतिहासकार इब्न-ए-बत्तूता कदंब राजा विरदेवच्या (१३२८-१३४५) एका मुलाचा संदर्भ देतो, ज्याने होनावरच्या नवाब जमालुद्दीनला सिंदबूर, म्हणजेच चंद्रपूर (जिथे विरदेवाचा एक राजपुत्र शहराच्या प्रशासनात मदत करत होता तर विरदेव आणि त्याचा दुसरा मुलगा गोवापुरी म्हणजे गोपकपट्टण येथे तैनात होते) ताब्यात घेण्याचे आमंत्रण लिहिले होते, ज्यामध्ये त्याने इस्लाम स्वीकारण्याचे आणि नवाबाच्या बहिणीशी लग्न करण्याचे वचन दिले होते जी आक्रमण करण्याची खोटी घडवलेली कहाणी पण असू शकते. त्यानुसार जमालुद्दीनने गोपकपट्टणवर हल्ला करण्यासाठी ५२ जहाजांचा ताफा तयार केला.

इतिहासकार इब्न-ए- बत्तूताने मोहिमेत सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर, जमालुद्दीनच्या देखरेखीखाली त्याला ताफ्याचा सेनापती बनवण्यात आले. तथापि, जमालुद्दीन चंद्रपुरावर हल्ला करण्याऐवजी गोवापुरी म्हणजे गोपकपट्टणवर हल्ला करतो ज्यामुळे विरदेव राजाला चंद्रपुरात पळून जाण्यास भाग पाडले जाते आणि तेथून विरदेव प्रतिहल्ला करतो आणि जमालुद्दीनला गोवापुरी म्हणजे गोपकपट्टणहून बाहेर काढण्यात यशस्वी होतो. तरीही, पुढच्या वर्षी, १६ ऑक्टोबर १३४५ रोजी जमालुद्दीन दुसरा हल्ला करतो, कदाचित एकाच वेळी गोवापुरी म्हणजे गोपकपट्टण आणि चंद्रपुरावर.

तोपर्यंत, विरदेवाचा मृत्यू झाला होता आणि त्याचा तरुण मुलगा सूर्यदेवाचा राज्याभिषेक करण्यात आला होता. १६ ऑक्टोबर १३४५च्या मध्यरात्री, एका लोककथेनुसार असे म्हटले जाते की होनावरचा नवाब जमालुद्दीनने गोवापुरी म्हणजे गोपकपट्टण (गोवा वेल्हा) आणि चंद्रपूर(चांदोर)वर एकाच वेळी हल्ला केला. ज्यामध्ये कदंब कुटुंबातील तरुण राजा सूर्यदेव मारला गेला (एका लोककथे नुसार ’अंतर्गत कट रचून त्याच्याच राजवाड्याच्या रक्षकांनी राजाला त्याच्याच शाही तलवारीने मारले) आणि त्याच्यासोबत कदंब कुटुंबातील सर्व पुरुष सदस्य मारले गेले. पण सूर्यदेवाची हत्या कुठे झाली हे स्पष्ट नाही. त्याची तरुण राणी विमोनादेवी तिच्या वडिलांच्या हंगल येथील राजवाड्यात गेली होती.

कदंब कुटुंबातील परंपरेनुसार तिला परत आणण्यासाठी एक दूत पाठवण्यात आला आणि ती घाईघाईने १८ ऑक्टोबर १३४५ रोजी चंद्रपुर येथे पोहोचली (मोरेस त्याच्या ’कदंब कुल’ या पुस्तकामध्ये म्हटले आहे की दूर असलेली राणी काही दिवसांनी आली) आणि तेव्हाच तिला विश्वासघात आणि तिच्या पतीच्या मृत्यूची माहिती मिळाली. तिच्या आगमनापूर्वी, राजदरबारातील सर्व महिलांनी त्यांचे दागिने कुशावती नदीत फेकले आणि नदीत उडी मारून आत्महत्या केली. अस्वस्थ राणीने चांदोरच्या महाद्वारासमोर पोहोचताच दगडावर तिच्या बांगड्या तोडल्या आणि तिच्या पायांना व टाचांना लागलेली धूळ तीन किंवा चार वेळा तिथंच साफ केली. कारण तिला त्या विश्वासघातकी शहराची धूळ पायावर वाहून नेण्याचीही इच्छा नव्हती. पुढे तिने चांदोर शहाराला शाप दिला व सती जाण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: "चार्म गेला, सर्वात वाईट परिस्थिती"! गोवा पर्यटनाबद्दल रंगली चर्चा; सोशल मीडियावर दिली कारणांची लिस्ट

Kieron Pollard Record: धोनी, 'हिटमॅन' शर्माचे चाहते नाराज! 'पोलार्ड'ने केला मोठा धमाका; मोठा विक्रम केला नावावर Watch Video

Chimbel Protest: '..आमचो गळो चिरलो'! युनिटी मॉलविरुद्ध चिंबलवासीय आक्रमक; आंदोलक बसले उपोषणाला Video

Goa Education: विद्यार्थ्यांचा ताण होणार कमी! गोव्यात नववीचे पेपर आता शाळाच काढणार; बोर्डाचा जुना निर्णय मागे

Gajkesari Rajyog 2026: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नशिबाची साथ! 'गजकेसरी राजयोग' उजळणार 'या' राशींचे भाग्य; आत्मविश्वास वाढणार, कामे फत्ते होणार

SCROLL FOR NEXT