India Population Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

India Population: लोकसंख्या का वाढवता?

India Declining Birth Rate: एकेकाळी ‘हम दो हमारे दो’ असा नारा असायचा. मग मुलगा व्हावा यासाठी ‘बेटर लक नेक्स्ट टाईम’ होऊ लागलं.

दैनिक गोमन्तक डिजिटल

स्मिता तिंबले

एकेकाळी ‘हम दो हमारे दो’ असा नारा असायचा. मग मुलगा व्हावा यासाठी ‘बेटर लक नेक्स्ट टाईम’ होऊ लागलं. मग ‘एकच पुरे’ किंवा ‘नको’ हे आलं. आता मात्र सरकारचे प्रयत्न लोकसंख्या वाढवण्याकडे लागलेले आहेत! हे कशाचे द्योतक आहे?

अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ असा सरसकट दिला जाणारा आशीर्वाद आता दृष्टीक्षेपातही नाही. हा आशीर्वाद कधीचाच कालबाह्य झाला. हे आठवण्याचे कारण अर्थात वर्तमानपत्रात वाचलेली ठळक बातमी. ती म्हणते की, भारतात मुलं जन्माला घालण्याचं आजचं प्रमाण कमी होत आलेलं आहे. ते २.१ वरून उतरून १.९ वर आलेलं आहे.

महिलांची प्रजनन क्षमता कमी होण्याची अनेक ठाशीव कारणं आहेत. पहिलं कारण आता मुलींचं विवाहाचं वय बरंच पुढे गेलंय. शाळा झाली, कॉलेज झालं की, आता लग्न, असा प्रघात आता नाही. मुलांप्रमाणेच मुलींनाही करीअर खुणावते आहे. आपली स्वप्नं फुलवायचे, आपली मोहर उमटवायला, नांव कमवायला, पैशांची ऊब जमवायला हेच वय असते. त्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी सारख्या वाटा सहज चोखाळल्या जातात.

यात ५-६ वर्षे अलगद निसटतात. त्यातूनही लग्न ठरलेच तरी माळ पडायला १-२ वर्ष उलटतातच. मग पुढे मातृत्व येईपर्यंत तिशीचा उंबरठा आलेला असतो. अशावेळी साहजिकच लहान कुटुंब असल्यास ते सांभाळणे सर्वार्थाने सोयीस्कर असते.

दुसरे कारण, आपली आर्थिक स्थिती सांभाळताना मुले जन्माला घालून त्यांचे पालनपोषण करणे, त्यांना उत्तम शिक्षण देणे.

आपले राहणीमान उत्तम राखणे. आपले करिअर घडवणे हे दिवसेंदिवस एक आव्हान ठरत आहे. म्हणून, आजकाल एकच किंवा नकोच मूल अशी प्रवृत्ती नवीन पिढीत दिसून येते. त्यामुळे एकंदर जन्म दर उतरतो आहे.

तिसरे कारण, कुटुंब नियोजन करण्याचे उपाय सोयीस्कर व प्रभावी असून देशाची लोकसंख्या नियंत्रित ठेवण्याचे काम ती चोख करते आहे.

या उपायांमुळे अर्थात-मुलगा किंवा मुलगी कुणीही असल तरी एकच पुरे इथपर्यंत विचार येऊन ठेपलेले पाहायला मिळतात.

दर एका राज्यात जन्मसंख्या वेगवेगळी आहे. तामिलनाड, पश्चिम बंगाल, दिल्ली सारख्या ठिकाणी जन्मदर घटतो आहे. तर, बिहार व उत्तर प्रदेश याठिकाणी त्याचा चढता क्रम आहे. तरी, त्यातील अंतर कमी होत चाललेले दिसते.

जन्मसंख्या उतरली की देशात एकूण तरूणपिढीचा आकडा कमी आढळतो. बहुसंख्य लोकसंख्येत पुढच्या पिढीतले. साठी उलटलेले, वयोवृद्ध नागरिक असतात. त्यामुळे कामासाठी तरूण मिळत नाहीत. देशाची आर्थिक परिस्थिती डळमळते. पेन्शन, वैद्यकीय मदत यासाठीचा खर्च वाढीस लागतो... इत्यादी.

राज्यातील जन्मदर वाढावा यासाठी काही राज्ये प्रयत्नशील आहेत. आंध्र प्रदेश राज्य तिसरे मूल झाल्यास दरमहा तीस हजार व चौथे मूल झाल्यास जोडप्याला चाळीस हजार रूपये देते! हे मला अतिशय आश्चर्यकारक व धक्कादायक वाटते.

एकेकाळी ‘हम दो हमारे दो’ असा नारा असायचा.

मग मुलगा व्हावा यासाठी ‘बेटर लक नेक्स्ट टाईम’ होऊ लागलं. मग ‘एकच पुरे’ किंवा ‘नको’ हे आलं. आता मात्र सरकारचे प्रयत्न लोकसंख्या वाढवण्याकडे लागलेले आहेत! हे कशाचे द्योतक आहे? भरमसाठ लोकसंख्या आपल्या देशाला कुठे घेऊन जाणार आहे? आपल्या समोरील अनेक प्रश्नांचे मूळ कारण आहे, आपली वाढलेली लोकसंख्या.

ती नियंत्रित ठेवणे चांगले? की येनकेन प्रकारे लोकसंख्या वाढवणे चांगले? लोकसंख्या वाढवण्यासाठीचे प्रयत्न करण्याचे खरे कारण काय आहे? कसली भीती लोकांच्या मनात घातली जात आहे? कसलाही आधार नसताना अकारण कसला विचार फैलावला जातो आहे? वाढीव लोकसंख्या आपल्या देशाला परवडणार आहे का? याचा विचार आधी करायला हवा की नको??

प्रगतिशील देशाच्या पायात वाढत्या लोकसंख्येची बेडी घालणे व पुन्हा देशाला संकटात टाकणे यात काय हशील आहे? बेरोजगारी, गरिबी, महागाई, राहण्याचा प्रश्न, जागेचा प्रश्न, पर्यावरण व नैसर्गिक समतोल राखणे अशा प्रश्नांचा सामना अगोदरच नागरिकांना करावा लागत आहे.जन्मदर वाढवून वाढत्या लोकसंख्येला तोंड द्यायला आपला देश सक्षम आहे का?

हे ‘म्हणजे आ बैल मुझे मार’ असे होईल. लोकसंख्या नियंत्रण हे एका दिवसात साध्य झालेले उद्दिष्ट नाही. त्यासाठी कित्येक वर्षे लागली आहेत. लोकांच्या मनात आपले कुटुंब लहान असावे, हे यायलाच बराच कालावधी लागला. घरोघरी दर वर्षी ‘पाळणा हलला’ असे व्हायचे. स्त्रियांना फक्त चूल व मूल यातच स्वतःला गुंतवून घ्यावे लागे. आताच सर्व स्थिरस्थावर झाल्यावर देशाचा जन्म दर वाढवण्यासाठी पावले उचलणे नक्कीच अयोग्य ठरते आहे. देशाला उलट दिशेने प्रवास करायला लावणे फार फार महागात पडेल, नाही का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT