Goa Birth Death Statistics: गोव्यात रोज किती जन्म आणि मृत्यू होतात? आकडेवारी आली समोर; नोंदणीचा तपशीलही उपलब्ध

Goa daily birth and death statistics: राज्‍यात दररोज सरासरी ४७ जणांचा जन्‍म आणि ४२ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून समोर आलेले आहे.
Goa daily birth and death statistics
Goa daily birth and death statisticsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात दररोज सरासरी ४७ जणांचा जन्‍म आणि ४२ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून समोर आलेले आहे. आमदार एल्‍टन डिकॉस्टा यांनी याबाबतचा प्रश्‍‍न विचारला होता.

२०२३ पासून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्‍यात किती जणांच्‍या जन्‍म आणि मृत्‍यूची नोंद झालेली आहे? कोणत्‍या तालुक्‍यातील किती जणांची याबाबत नोंदणी झालेली आहे? किती जणांच्‍या जन्‍म आणि मृत्‍यूची नोंदणी उशीरा करण्‍यात आली? असे उपप्रश्‍‍नही आमदार डिकॉस्टा यांनी विचारले होते.

Goa daily birth and death statistics
Goa Opinion: प्रत्येक आमदाराला विकासकामांसाठी 100 कोटी दिल्यावर काय फरक पडू शकतो?

त्‍यावरील उत्तरात २०२३ पासून ३१ जानेवारी २०२६ पर्यंत राज्‍यात ५२,६४४ जणांच्‍या जन्‍माची, तर ४७,५७० जणांच्‍या मृत्‍यूची नोंद झालेली असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी म्‍हटले आहे.

Goa daily birth and death statistics
Goa Opinion: गोवा आणि लोकशाही, या दोन्हींचे रक्षण रस्त्यावर उतरूनच होऊ शकते...

यावरून प्रत्‍येक दिवसाला राज्‍यात सरासरी ४७ जणांचा जन्‍म होत असल्‍याचे, तर ४२ जणांचा मृत्‍यू होत असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. या काळात उत्तर गोव्‍यात १५,६२१ पुरुष आणि १४,७५१ महिला असे मिळून ३०,३७२ जणांचा जन्‍म झाला, तर १७,५५७ पुरुष आणि ११,७६४ असे मिळून २९,३२१ जणांचा मृत्‍यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com