Urban Planning Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Urban Planning: शहरांची ओळख की विद्रुपीकरण? बेशिस्त वाहतूक, पोस्टरबाजी आणि पादचाऱ्यांच्या 'जीवघेण्या' प्रवासाची भीषण वास्तवता!

Urban Visual Pollution: जेथून पादचारी जीव मुठीत धरून जातात, त्यांना ‘पदपथ’ किंवा ‘फूटपाथ’ असे म्हणण्याची पद्धत आहे!

दैनिक गोमन्तक डिजिटल

शहरांनाही स्वतःची अशी ओळख असते. त्या त्या शहराची परंपरा, इतिहास यांमधून जशी ती घडते, तशीच तेथील रस्ते कसे आहेत, त्यावरील वाहतुकीचे व्यवस्थापन कसे केले जाते, नगरनियोजन कसे आहे, यावरही बरेच काही अवलंबून असते. दुर्दैवाने सर्व प्रमुख शहरांतील रस्त्यांची अवस्था बेशिस्त वाहतूक, अनियंत्रित गर्दीमुळे वाईट झाली आहे.

जेथून पादचारी जीव मुठीत धरून जातात, त्यांना ‘पदपथ’ किंवा ‘फूटपाथ’ असे म्हणण्याची पद्धत आहे! सर्वोच्च न्यायालयानेही पादचाऱ्यांच्या दुःस्थितीची नुकतीच दखल घेऊन पादचाऱ्यांच्या मूलभूत हक्कावर गदा येत असल्याचे नमूद केले. या सगळ्या समस्येत भर घालतात ते पोस्टरबाज.

वाढदिवसांपासून श्रद्धांजलीपर्यंत आणि कार्यक्रमांच्या माहितीपासून ते विविध वस्तूंच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांचे पोस्टर, बॅनर, कटआऊट रस्त्याच्या आणि त्या शहराच्या विद्रुपतेत भर घालतात. तमिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांनी पोस्टरच्या विरोधात मोहीमच सुरू केली आहे. या अक्राळविक्राळ समस्येविषयी.

पादचारी मृत्यूचे प्रमाण

गोव्यात गेल्या १० वर्षांत रस्ते अपघातांमुळे सुमारे २,५०० ते २,८०० लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये दरवर्षी सरासरी २५० लोकांचा मृत्यू होतो. वाहतूक विभाग आणि गोवा पोलिसांच्या ट्रॅफिक सेलच्या अधिकृत अहवालानुसार, एकूण मृतांत पादचाऱ्यांच्या (Pedestrians) मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असून, विशेषतः राष्ट्रीय महामार्गांवर चालताना मागून वाहनाने धडक दिल्याने सर्वाधिक पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे.

पादचाऱ्यांची कोंडी

पणजी,मडगावमध्ये उत्तम रस्ते, मात्र पदपथ मोकळे मिळणे अपवादानेच.स्मार्ट रस्त्यांची आणि ड्रेनेज, केबलची वेगवेगळी कामे सुरू असल्याने पादचाऱ्यांची कोंडी अतिक्रमणांमुळे पदपथ अस्तित्वहीन विशेषतः बाजारपेठांच्या, वर्दळीच्या रस्त्यांवर पदपथ पादचाऱ्यांसाठी उपलब्ध असणे गरजेचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT