वाहतूक नियमांचे डोळ्यांसमोर उल्लंघन, रक्षक सुस्तच; राजधानी पणजीत पाटो पुलावर रात्रीची स्‍थिती गंभीर; 'नो एन्‍ट्री'तूनही शिरतात वाहने

Patto Bridge traffic violations: राज्‍यातील अपघात आणि त्‍यात मृत पावणाऱ्यांची संख्‍या प्रत्‍येकवर्षी वाढत आहे.
Patto Bridge traffic violations
Patto Bridge traffic violationsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील अपघात आणि त्‍यात मृत पावणाऱ्यांची संख्‍या प्रत्‍येकवर्षी वाढत आहे. परंतु, वाहतूक नियमांचे उल्लंघन डोळ्यांसमोर घडत असतानाही दिवसभर ‘चलनां’वर जोर देणारे वाहतूक पोलिस रात्रीच्‍यावेळी त्‍याकडे पूर्णत: काणाडोळा करीत असल्‍याचे मांडवीवरील जुन्‍या पुलावर प्रत्‍येक दिवशी दिसून येत आहे.

रुआ दी ओरेम खाडीवरील जुना पूल परिसरात असलेल्‍या काही हॉटेल्‍समध्‍ये रात्रीच्‍यावेळी स्‍थानिकांसह पर्यटकही येतात. या पुलावर एका बाजूने ‘नो एन्‍ट्री’ आहे. तरीही रात्रीच्‍यावेळी या पुलाच्‍या दोन्‍ही बाजूंना असलेल्‍या फुटपाथवर अनेक वाहने पार्क करण्‍यात येत आहेत.

Patto Bridge traffic violations
Goa Weather: राज्यात उष्णतेचा जोर, पावसाची प्रतीक्षा; मान्सून सक्रिय नसल्याने तापमानात सातत्याने वाढ

सोबतच ‘नो एन्‍ट्री’मधून मद्यपी वाहनचालक भरधाव वेगाने वाहने हाकत आहेत. परंतु, या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्‍याने निरपराध वाहनचालकांतून तीव्र संताप व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

Patto Bridge traffic violations
ED Raid Goa: 'साळगावकर' समूहाची 1,023.85 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, अवैध लोहखनिज उत्खननप्रकरणी 'ईडी'ची कारवाई

‘त्‍या’ पोलिसांवर कारवाई करा!

पाटो येथील जुन्‍या पुलावर रात्रीच्‍यावेळी गस्‍तीसाठी नेमण्‍यात येणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून वारंवार कर्तव्‍यात कसूर केली जात आहे. त्‍यांच्‍याकडूनच अभय मिळत असल्‍याने स्‍थानिक तसेच पर्यटकही थेट पुलावरील फुटपाथवर वाहने पार्क करून वाहतुकीस अडथळे निर्माण करीत आहेत. त्‍यामुळे सरकारने प्रथम अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटो परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com