Par River Pollution: अस्नोडातील पार नदीच्या प्रदूषणाची गंभीर दखल! 'या' रिसॉर्टची ग्रामस्थांकडून पोलखोल; मानवाधिकार आयोगाने बजावली नोटीस

Asnoda river pollution Goa: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि मोईते-अस्नोडा येथील क्लब महिंद्रा रिसॉर्टच्या व्यवस्थापकांना या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Asnoda river pollution Goa
Par River PollutionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अस्नोडा येथील पार नदीत होत असलेल्या प्रदूषणाची गंभीर दखल घेत गोवा मानवाधिकार आयोगाने पेयजल विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि मोईते-अस्नोडा येथील क्लब महिंद्रा रिसॉर्टच्या व्यवस्थापकांना या प्रकरणी २६ ऑगस्ट रोजी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

अस्नोडा येथील स्थानिक रहिवाशांनी दाखल केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण बार्देश तालुक्यासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेली पार नदी सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाली आहे. मोईते-अस्नोडा येथील ‘क्लब महिंद्रा’ हॉटेलमधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी बेकायदेशीरपणे नदीत सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तक्रारीनुसार, वाहतूक खर्च वाचवण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने हे सांडपाणी नदीत सोडले जाते. यामुळे नदीचे पाणी शेवाळलेले आणि तीव्र दुर्गंधीयुक्त झाले असून, संपूर्ण परिसराला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Asnoda river pollution Goa
Goa Politics: 'आरजी'कडून निमंत्रणाचे स्वागत, निवडणूक आघाडीसाठी 'काँग्रेस'कडून चर्चेचा प्रस्ताव

पाण्याला दुर्गंधी

हे पाणी संपूर्ण बार्देश तालुक्यातील हजारो नागरिकांना पिण्यासाठी पुरवले जात आहे. या रासायनिक प्रक्रियेमुळे पुरवठा केल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी आणि विचित्र चव येत असून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती भारत पी. देशपांडे, सदस्य निवृत्त न्यायमूर्ती डेसमंड डिकोस्टा आणि प्रमोद व्ही. कामत यांच्या खंडपीठाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आदेश जारी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com