Donkey Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Opinion: गाढ वाचेने करू गाढवाचे गुणगान!

Goa Opinion: गाढव हा एकुलता एक प्राणी गोव्यात हयात आहे. त्यामुळे, गाढवाचे महत्त्व अन् श्रेष्ठत्व यांचे गुणगान आपल्या गाढ वाचेने होणे आवश्यक आहे. ‘एकुलत्या एक’ असलेल्या गोष्टींची गणना प्रेक्षणीय स्थळांमध्ये होते.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रमोद भिसो कारापूरकर

‘संपूर्ण गोव्यात एकच गाढव आहे’, असे विधानसभेच्या पटलावरून जाहीर झाल्याची बातमी वाचून बरं वाटलं. पण, ते कुठं आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. विधानसभेतील आमदारांना जर विचाराल तर ते सरळ सांगतील की येथे कुणीच ‘गाढव’ नाही.

पण त्यांच्या करामती अन् कुरापती पाहिल्यावर सहसा सर्वसामान्य व्यक्ती यावर विश्वास ठेवतील का? निरभ्र मनातून पाहिल्यावर कुणीही नाही म्हणणार नाही, पण विनाकारण त्यांना दोष देण्यातही अर्थ नाही. कारण व्यक्ती कशाही असल्या तरी तुझे विचार- आचार मला आवडत नाही म्हणून एकाने लाथा मारण्यास सुरुवात केली तर एकुलत्या एक प्राण्याची आठवण येणे स्वाभाविक आहे.

पण चांगल्या आमदारांना किंवा व्यक्तींना कुणी ‘गाढव’ म्हटल्याचं आवडलं नाही. ते तर योग्यच आहे. पण ज्या व्यक्तीला आपली स्वतःची ओळख नाही त्याचे वागणे अन् वावरणं जर त्या एकुलत्या एका प्राण्यासारखे असले तर सर्वसामान्यांना त्याची आठवण येणे शक्य आहे.

पण चार पायांचा अन् दोन पायांचा यातील फरक ज्यावेळी वागणुकीतून दिसून येतो त्यावेळी सहसा मित्र-मित्रांना सुद्धा म्हणून जातात, ‘काय गाढवासारखा वागतो!’ पण तोच प्राणी जर गोव्यात एकच असेल तर आपल्या सोबतचा मित्र तो नसावा असे वाटणे स्वाभाविक आहे.

पण गोव्यात ‘एकच गाढव’ ही बातमी मग खरी की खोटी याचा शोध पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे. याबाबतीत घरातील सर्वांच्या धर्मपत्नीला हे शोधाशोध करण्याचे काम दिले तर त्या लगेच कळवतील, ‘आमच्या घरात येऊन पाहा. आमचा एकुलता एक नवरा कधी कधी असा वागतो की, विधानसभेत ज्या मंत्र्यांनी ही माहिती पुरविली तो प्राणी आपल्या गळ्यात पडला.’, असं त्या ‘होममिनिस्टर’ला वाटणे साहजिकच आहे! पण घरच्या ‘होममिनिस्टर’चं मत हे तुमचं आमचं मत होऊ शकत नाही. त्यामुळे घरच्या मालकाला आपण तरी ‘गाढव’ म्हणू शकत नाही.

मग गोव्यात जर एकच गाढव प्राणी आहे तर हा कुठे असेल याचा शोध घेणे आवश्यक आहे. कारण एकच पण दुर्मीळ असा प्राणी आपल्या गोव्यात असणं हे गोव्याला स्वाभिमानाची गोष्ट आहे. ‘एकुलत्या एक’ असलेल्या गोष्टींची गणना प्रेक्षणीय स्थळांमध्ये होते.

प्राण्यांच्या शिरगणतीनुसार ‘एकच गाढव’ आहे, हे तर सिद्ध झाले आहे. बाकीची जंगली दुभती जनावरे खूप आहे. त्याची काळजी नाही पण एकुलता एक प्राणी जर गोव्यात असेल तर त्याची अतिअल्पसंख्य म्हणून काळजी घेणे सरकारचं प्रथम कर्तव्य असावयास हवं. दुर्मीळ, लुप्तप्राय प्राण्यांच्या यादीत याची नोंद होणे आवश्यक आहे. पुढे नवीन शालेय विद्यार्थ्यांना याचे दर्शन देण्यासाठी खास शाळेतून सहली काढल्या जातील. पण ते आता कुठे आहे याचा शोध लावला पाहिजे.

मूर्ख माणसाला गाढव म्हटला तर चालेल पण गाढवाला गाढव म्हटल्यावर तो तुम्हांला लाथा मारल्याशिवाय राहणार नाही. दारुड्याला जर कोणी दारुडा म्हटलं की त्याचा पारा लगेच चढतो. तसं गाढवाला गाढव म्हटलं तर तो मागच्या पायाच्या लाथेने तुमचं थोबाड रंगवण्यास मागेपुढे पाहणार नाही. गाढवाचा अंदाज चुकला तर ब्रह्मचर्यही जाण्याची शक्यता आहे.

एकुलता एक प्राणी असल्यामुळे ब्रह्मचर्य गेले तरी बेहत्तर गाढव जाता कामा नये. पण काही का असेना. मंत्र्याने जर सांगितले असेल की ‘गोव्यात एकच गाढव’ आहे तर त्याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यास एका कोंडवाड्यात अथवा कुंभाराच्या दारी बांधून ठेवले पाहिजे. यासाठी त्याचा प्रथम शोध घेणे आवश्यक आहे.

सरकारी अथवा प्रायव्हेट नोकरीत काही कर्मचारी एवढं कामे करतात, ऑफिसचा वेळ झाल्यावरसुद्धा स्वतःच्या बॉसला खूश करण्यासाठी राबराब राबतात. अन् इतरजण त्याची वाहवा करण्यासाठी ‘काय गाढवासारखा काम करतोस. प्रमोशन मिळविण्यासाठी! ’ असं उपहासाने म्हणतात. हे मला आवडत नाही. कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्याला गाढवाची उपमा देणे हे आता बंद झालं पाहिजे. कारण गाढव हा एकुलता एक प्राणी गोव्यात हयात आहे.

गाढवाचे महत्त्व अन् श्रेष्ठत्व यांचे गुणगान आपल्या गाढ वाचेने होणे आवश्यक आहे. एवढी वर्षे आपण रस्त्यावर भटकी गुरे, कुत्रे बघत होतो. पण एकदाही कुणी रस्त्यावर बेवारशी बसलेले अथवा ध्यानस्थ उभे असलेले गाढव पाहिले नाही. गाढव अत्यंत कामसू (खूप काबाडकष्ट करणारे या अर्थी) प्राणी आहे. त्याला निर्बुद्धतेचा शाप माणसामुळे लागला आहे. त्यात त्याचा दोष नाही. आता तर तो गोव्यात एकुलता एक उरलाय. तेव्हा त्याचा शोध घेऊ, गाढवाविषयी गाढ वाचे बोलू!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

Rohit Sharma Record: मास्टर-ब्लास्टरचा मोडला मोठा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा ठरला सर्वात वयस्कर भारतीय फलंदाज; वनडे क्रमवारीत 'हिटमॅन'चे राज्य

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

SCROLL FOR NEXT