Goa Ghost Stories Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goan Ghost Stories: पर्वरीत पांढऱ्या वेषातील बाई दिसली, मांडवी पुलावर पोचेपर्यंत त्या भुताने माझा पाठलाग केला; भुतांचे अस्तित्व

Goa Ghost Stories: माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबातल्या वृद्ध स्त्रिया आम्हा मुलांना रात्री झोपण्यापूर्वी भुताखेतांच्या, देवचाराच्या, म्हारवाच्या गोष्टी सांगत.

गोमन्तक डिजिटल टीम

दत्ता नायक

आपण भूत पाहिल्याचे सांगणारे अनेक मित्र मला भेटतात. ‘मी मध्यरात्री गाडी चालवत म्हापशाहून पणजीला येत होतो. मुसळधार पाऊस पडत होता. मी पर्वरीला पोहोचलो तर रस्त्याच्या बाजूला उभी असलेली पांढऱ्या वेषातील बाई मला दिसली. तिचा चेहरा मात्र मी पाहू शकलो नाही. मांडवी पुलावर पोहोचेपर्यंत त्या भुताने माझा पाठलाग केला. माझा भयाने थरकाप उडाला.’ असे एका ज्येष्ठ मित्राने मला सांगितले.

दुसरा मित्र म्हणाला, ‘जुवारी पूल (जुना) ओलांडल्यावर वेर्ण्याची चढण लागते तिथे रात्री एक पाद्री लिफ्ट मागतो. ते पाद्रीचे भूत लिफ्ट दिल्यावर अचानक गाडीतून गायब होते. हे भूत असल्याचे माहीत असल्याने मी त्याला लिफ्ट दिली नाही. तर काय? अचानक पाद्रीचे भूत गाडीत माझ्या शेजारी येऊन बसले.’

माझ्या लहानपणी आमच्या एकत्र कुटुंबातल्या वृद्ध स्त्रिया आम्हा मुलांना रात्री झोपण्यापूर्वी भुताखेतांच्या, देवचाराच्या, म्हारवाच्या गोष्टी सांगत. त्यावेळी संडास मागीलदारी असत. कोणी एखादी वृद्ध स्त्री नैसर्गिक विधी करण्यासाठी मध्यान्हरात्री मागीलदारच्या संडासात जाई, तेव्हा तिला हातात दिवटी घेऊन जाणारा देवचार दिसे.

भूत पाहिल्याचे सांगणारे मित्र मला भेटतात पण देव पाहिल्याचे सांगणारे कोणीच भेटत नाही.वास्तविक ‘भूत’ व ‘देव’ ह्या संकल्पना काल्पनिक व मानवनिर्मित आहेत. त्यावर विश्वास ठेवण्याचे कारण नाही.

मानवी मन Hallucinate झाले की मनःचक्षूपुढे भूत येऊ शकते.भूत म्हणजे माणूस मेल्यावर त्याचा अतृप्त आत्मा अशरीरी बनतो. आत्माच नसल्यामुळे भुताचे अस्तित्व असणे शक्य नाही. माझी आई मला सांगायची - भुते असलीच तर ती चांगली असतात.

राखणदार असतात. ‘देंवचार’, ‘म्हारू’ ही भुते आपल्याला अपाय करत नाहीत. उलट रात्री आपण अडचणीत सापडल्यावर आपल्या मदतीस येतात. त्यामुळेच त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना बुधवारी व रविवारी तिन्हीसांजेला ‘सूर’, ‘रोंट’ देतो.

भयानक व अपाय करणाऱ्या भुतांची संकल्पना पूर्णपणे पाश्चात्य आहे. भारतीय संकल्पनेपासून ती वेगळी आहे. ही भुते डूख धरून सूड घेतात. अनेक इंग्रजी चित्रपटांत ही भुते दिसतात. कुठल्याच संस्कृत नाटकात भूत नाही.

पण शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकात हॅम्लेटच्या वडिलांचे भूत आहे. लहान वयात मुलांना भुतांच्या गोष्टी सांगून घाबरवू नये. मग मुले भित्री होतात. मुलांनी निर्भय बनायला हवे. स्वामी विवेकानंद म्हणतात, जेव्हा निर्भयता मुख्य दारातून प्रवेश करते तेव्हा सर्व दुर्गुण खिडकीतून उडी मारून पसार होतात.

काळोखाची भीती, भुतांची भीती, देवाची भीती, वडिलांची भीती, समाजाची भीती ह्यापासून लहान मुलांना दूर ठेवले पाहिजे. केवळ मनोरंजन म्हणून भुतांच्या गोष्टी सांगणे किंवा ऐकणे हे ठीक आहे. पण त्यापलीकडे जाऊन भुतांवर विश्वास ठेवू नये. गेल्या रविवारच्या ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झालेली ‘पुराणिक’ ही पाच भुतांची विलक्षण भूतकथा अनेक वाचकांना आवडली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ वाचकांच्या मनोरंजनासाठी लिहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: मडगाव पालिकेच्या 'तिठ्या'वरच जुगाराचा अड्डा; सायंकाळ झाली की 'गडगडा' सुरू! प्रशासनाची डोळेझाक

Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Bangladesh Violence: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; गॅरेजमध्ये झोपलेल्या 23 वर्षीय तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं VIDEO

Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

Viral Video: जुगाड की वेडेपणा? एक कार अन् 50 प्रवासी! व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण, म्हणाले, 'हे भारतातच शक्य'!

SCROLL FOR NEXT