Pramod Yadav
जगात अनेक रहस्यमय जागा आहेत ज्याचे गूढ आजवर उघडलेले नाही. अशा ठिकाणी जाणं लोकं देखील टाळतात.
गोव्यात देखील अशा काही जागा असून त्याबाबतच गूढ लोकांना तिथे जाण्यापासून रोखतं. कोणत्या आहेत त्या जागा जाणून घेऊया.
Santimol येथे असणारे D’Mello House असेच एक रहस्यमय ठिकाण आहे. असे सांगितले जाते की येथे दोन भावांच्या वादात एकाचा मृत्यू झाला अन् तेव्हापासून हे घर पडीक आहे.
साळगावला गोव्याचे रहस्यमय गाव म्हणून ओळखले जाते. येथे एका अदृष्य बाईची भीती लोकांमध्ये पाहायला मिळते.
आगोंद येथे रशियन द्वारा उभारण्यात आलेले हॉटेल Ghost Hotel म्हणून प्रसिद्ध आहे. अवैध असणारे या हॉटेलमध्ये विचित्र घटना घडतात असा समज आहे.
बोरी पूलाबाबत देखील एक भीती प्रचलित असून, येथे देखील एका अदृष्य बाईचा कहर पाहायला मिळतो असा समज आहे.
सत्तेसाठी दोन राजांची हत्या झाल्याने कासावली येथील Three King Church चर्चेत असते. ही जागा देखील रहस्यमय जागा म्हणून प्रसिद्ध आहे.