काय आहे Ghost Call? तुम्ही तो तुमच्या फायद्यासाठी यूज शकता; जाणून घ्या

तुम्हाला घोस्ट कॉल बद्दल माहिती आहे का? जर नसेल, तर तुम्हाला हा कॉल आला असला तरी, तुम्हाला कदाचित त्याबद्दल कळले नसेल.
काय आहे Ghost Call? तुम्ही तो तुमच्या फायद्यासाठी वापरु शकता; जाणून घ्या
Goa Police Bust Fake Call CenterDainik Gomantak
Published on
Updated on

Ghost Call: तुम्हाला घोस्ट कॉल बद्दल माहिती आहे का? जर नसेल तर तुम्हाला हा कॉल आला असला तरी, तुम्हाला कदाचित त्याबद्दल कळले नसेल. तसे, बरेच यूजर्स स्वतःच्या फायद्यासाठी घोस्ट कॉल करतात. जर तुम्हालाही स्वतःसाठी घोस्ट कॉलचा फायदा घ्यायचा असेल, तर आम्ही त्याबद्दल येथे सविस्तर सांगणार आहोत.

घोस्ट कॉल म्हणजे काय?

घोस्ट कॉलचा फायदा घेण्यापूर्वी घोस्ट कॉल म्हणजे काय हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. घोस्ट कॉल म्हणजे असा फोन कॉल ज्यामध्ये दुसऱ्या बाजूला कोणीही नसते. याला 'फॅन्टम कॉल' असेही म्हणतात. बऱ्याच वेळा टेलिमार्केटिंग कंपन्या अशा कॉल्सचा वापर करतात. तुम्ही तुमच्या फायद्यासाठी घोस्ट कॉल देखील वापरु शकता.

काय आहे Ghost Call? तुम्ही तो तुमच्या फायद्यासाठी वापरु शकता; जाणून घ्या
Mukesh Ambani & Gautam Adani: अंबानी-अदानींची चांदी; एकाच दिवसातच कमावले 'करोडो'

घोस्ट कॉलचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?

बऱ्याचदा तुम्ही अशा ठिकाणी अडकता जिथे तुम्हाला जायचे नसते आणि त्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला अगदी कंटाळवाणे वाटते. तसेच, तुम्ही काहीही न बोलता उठून येथून बाहेर जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, घोस्ट कॉल फायद्याचा ठरु शकतो. यामध्ये, तुमचा फोन तुमच्या नियोजित वेळेवर वाजतो आणि तुम्ही फोन उचलता आणि बोलण्याच्या बहाण्याने बाहेर जाता.

घोस्ट कॉलची सुविधा कुठे मिळते?

अनेक अॅप्स घोस्ट कॉलिंग देतात, ज्यामध्ये ट्रूकॉलरचा समावेश आहे. ज्याने आयफोनसाठी अलीकडेच एक मोठे अपडेट आणले आहे जे iOS आणि Android डिव्हाइसवर यूज करु शकता. जरी ट्रूकॉलरचे घोस्ट कॉलिंग फीचर प्रीमियम सबस्क्राइबर्ससाठी उपलब्ध असले तरी, ते अॅक्सेस करण्यासाठी पेड प्लॅन आवश्यक आहे.

ट्रूकॉलरवर तुम्ही घोस्ट कॉलरचे नाव आणि फोन नंबर कस्टमाइझ करु शकता आणि कॉलर आयडी अधिक वास्तववादी दिसण्यासाठी त्यात एक फोटो देखील जोडू शकता. ट्रूकॉलर वापरकर्त्यांना घोस्ट कॉल्स शेड्यूल करण्याची परवानगी देते.

काय आहे Ghost Call? तुम्ही तो तुमच्या फायद्यासाठी वापरु शकता; जाणून घ्या
Mukesh Ambani बनले जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली CEO; एलन मस्क आणि सुंदर पिचाई यांना सोडले मागे

अ‍ॅप उघडा आणि घोस्ट कॉल पर्याय निवडा

घोस्ट कॉलरचे नाव, फोन नंबर आणि कॉलर आयडी फोटो यासारखी महत्वाची माहिती भरा.

तुम्हाला कॉल कधी करायचा आहे ते निवडा. तुम्ही तो लगेच शेड्यूल करु शकता.

सध्या, तुम्ही एका वेळी फक्त एकच घोस्ट कॉल शेड्यूल करु शकता आणि तो नंतरच्या तारखेला सुरु करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com