Umakant Poke, Goa Clay Artist Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Clay Art Goa: कोण सांगतो युवा पिढी मातीत हात घालत नाही? गोव्यातील शिल्पकाराने मातीकलेबद्दल मांडले रोखठोक मत

Clay Artist Goa: कुठल्याही कलेची आराधना करत असताना आपल्याला तिच्याशी समरस व्हावे लागते. कलेची अगोदर आवड निर्माण व्हायला हवी. कला आपल्याला कधीही अर्ध्यावर सोडून जाणार नाही.

Sameer Panditrao

उमाकांत पोके

मातीत हात घालाल तरच माती तुम्हाला तिला एका सुंदर आकारात बदलण्यासाठी मदत करू शकते. मातीच्या प्रत्येक कलाकाराने कलेकडे प्रथम ती एक कला म्हणून बघावी, व्यवसाय म्हणून बघू नये. मग ती कला तुम्हाला कधीच उपाशी टाकणार नाही. सरकारी नोकरीपेक्षाही कला तुम्हाला जास्त प्रसिद्धी पैसा मान सन्मान मिळवून देऊ शकते.

कुठल्याही कलेची आराधना करत असताना आपल्याला तिच्याशी समरस व्हावे लागते. कलेची अगोदर आवड निर्माण व्हायला हवी. जर आपल्याकडे कला असेल तर आपल्या आत्मविश्वासाला जागृत करा, त्या कलेकडे पूर्ण वेळ द्या. कला आपल्याला कधीही अर्ध्यावर सोडून जाणार नाही.

गणेश चतुर्थी तोंडावर आल्यानंतर जून महिना लागण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात राज्यात महाराष्ट्रातील भागांतून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती येतात. चतुर्थीच्या काळात ठिकठिकाणी चित्रशाळांमधून गणपती मूर्ती विक्रीची दुकाने थाटली जातात.

त्या दुकानांमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच विक्रीला असतात. ह्या मूर्ती विकणारे खरोखरच कलाकार आहेत का असाही कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो. प्रत्येक नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी जर ठरवले की आपण यापुढे कधीही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे पूजन करणार नाही तरच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर नियंत्रण येऊ शकेल. जे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणून विक्री करतात ते कलाकार नसतात तर ते केवळ व्यवसाय करत असतात.

गोवा सरकारकडूनही कलाकारांना योग्य ते स्थान सन्मान दिला जात आहे. मी हल्लीच पोर्तुगालला मातीकलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी गेलो त्यावेळी गोवा सरकारकडून मला शंभर टक्के सहकार्य मिळाले. कला आणि संस्कृती खाते, हस्तकला महामंडळ व इतर सरकारी विभागानेही मला सहकार्य केले त्यामुळे मी प्रथमच पोर्तुगालला जाऊन, त्या ठिकाणी माझ्या कलेचे प्रदर्शन आणि मार्गदर्शन करू शकलो.

आणि कोण सांगतो आजची युवा पिढी मातीत हात घालत नाही म्हणून? मोरजी गावातील पोकेवाडा येथील आमच्या चित्रशाळेमध्ये मातीत हात घालायला विद्यार्थी आवर्जून येतात. दरवर्षी किमान चार-पाच विद्यार्थी गणपतीची मूर्ती तयार करण्याचे, शिल्पकलेचे मार्गदर्शन घेण्यासाठी माझ्याकडे येतात. हे मार्गदर्शन मी त्यांना मोफत देतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: अर्शदीप सिंहनं टाकलं 13 चेंडूंचं षटक! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावावर केला लाजिरवाणा रेकॉर्ड

Goa Politics: 'भाजपचं 13 वर्षांचं राजकारण म्हणजे भ्रष्टाचाराची गाथा!' गोव्यात दाखल होताच अरविंद केजरीवाल यांचा सावंत सरकारवर हल्लाबोल VIDEO

Goya Club Seal: परवानग्यांमध्ये घोळ, सुरक्षा नियमांची ऐशीतैशी, वागातोरमधील प्रसिद्ध 'गोया' क्लब सील; गोव्यातील नाईटलाइफला कडक संदेश

Crime News: एकाला फाशी, 9 जणांना जन्मठेप... हिंसाचार करुन हत्या करणाऱ्या नराधमांना कोर्टाचा दणका; काय आहे नेमकं प्रकरण?

VIDEO: भारतीय सागरी सीमेत घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळला, बोट जप्तीसह 11 खलाशी जेरबंद; तटरक्षक दलाची मोठी कारवाई!

SCROLL FOR NEXT