Chimbel Krishna Temple Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Chimbel Krishna Temple: देवळी पाडली तर 4 मूर्तींचे काय होणार? मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला 'तीर्थकोटी कॉरिडॉर'चा विचार!

Chimbel Sacred Site Preservation: चिंबल येथील देवळी पाडली तर या मूर्तींचे काय करावे, हा यक्षप्रश्न समोर येणार आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डॉ. मधु घोडकिरेकर

चिंबल येथील देवळी पाडली तर या मूर्तींचे काय करावे, हा यक्षप्रश्न समोर येणार आहे. ‘गोमांतक शुद्धीचा इतिहास; या पुस्तकाच्या कोकणी अनुवाद प्रकाशनाच्या वेळी हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिला गेला. मुख्यमंत्र्यांनी या विषय उचलून धरला, व आपण ‘तीर्थकोटी कॉरिडॉर’च्या धर्तीवर या स्थानाचा विचार करू, असे जाहीर केले.

चिंबल येथील जागेत मसुराश्रमाकडून एक मंदिर उभारण्याचे प्रयत्न वीस वर्षांपूर्वी झाले होते, त्यासाठी त्यांनी राजस्थानहून चार सात फुटी पाषाणी मूर्ती आणल्या होत्या. येथे उपलब्ध असलेल्या सुमारे ७ हजार चौ. मी.जागेपैकी थोडा भूखंड मंदिरासाठी देण्यास मालक तयार झाला. जमीन मालक तयार होता, पण वामनमूर्ती नामक मसुराश्रमाच्या प्रतिनिधीने, सपूर्ण भूखंड आश्रमासाठी हवा असा हट्ट धरला. पुढे प्रकरण न्यायालयात गेले व तेथे जमीनमालकाची बाजू उजवी ठरली. जमीनमालकाने अजून न्यायिक जोर लावल्याने येथील श्री कृष्णाची देवळी अवैध ठरविण्यात आली व तेथील वीज जोडणीही तोडली आहे. दरम्यान, वामनमूर्तीचे आकस्मिक निधन झाल्याने, मसुराश्रमाकडून येथे लक्ष देणे पूर्णपणे बंद झाले.

सन २०२१ साली जमीनदाराच्या बाजूने हुकूमनामा अंबलबजावणीसाठी दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता, पण अर्जदाराने पाठपुरावा न केल्याने तो खटला बंद करण्यात आला होता, पण आता पाच वर्षांनी तो परत सुरू करण्यात आला आहे. सदर देवळी पाडली तर या मूर्तींचे काय करावे, हा यक्षप्रश्न समोर येणार आहे. ‘गोमांतक शुद्धीचा इतिहास; या पुस्तकाच्या कोकणी अनुवाद प्रकाशनाच्या वेळी हा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिला गेला. मुख्यमंत्र्यांनी या विषय उचलून धरला, व आपण तीर्थकोटी कोरीदोर धर्तीवर या स्थानाचा विचार करू, असे जाहीर केले. त्यानंतर या विषयाची राज्यभर चर्चा आहे व या मूर्ती पाहण्यास लोकांची पावले या श्रीकृष्ण देवळीकडे वळत आहेत.

बहिष्कृत करणाऱ्यांची शुद्धी हवी : वीर सावरकर

‘गोमांतक शुध्दीचा इतिहास’ या मराठी पुस्तकाच्या कोकणी अनुवादाचा प्रकाशन कार्यक्रम नुकताच पणजीत झाला. या कार्यक्रमात, पुस्तक परिचय करण्याची जबाबदारी दुसऱ्या कुणावर तरी होती, तर या घटनेकडे बाधीत समाज कसा पाहतो यावर भाष्य करण्याची माझ्यावर जबाबदारी होती. त्या पुस्तकाविषयी थोडे जाणून घेऊया.

‘गोमांतक शुध्दीचा इतिहास’ हे प्रथम १९३० साली प्रसिद्ध झाले तेव्हा दासबोध मासिकाचा विशेष अंक म्हणून प्रसिद्ध झाले होते, ज्याला वीर सावरकरांची प्रस्तावना लाभली होती. त्यात दोन वर्षांपूर्वी (१९२८ साली) विनायक महाराज मसुरकर यांनी ख्रिश्चन गावड्यांचे शुद्धीकरण कसे केले, याची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली होती. जोडीला, आर्यसंस्कृतीचा इतिहास, हिंदुकरणाचे सनातनत्व, गोमंतकाचा त्यावेळचा भौगोलिक परिसर व गोमंतकातील हिंदूंचा छळ इतिहास, प्रतिष्ठित लोकांनी लिहिलेले लेख, पत्रे. आकडेवारी तक्ते, अशी माहिती देऊन हा विशेष अंक सजवला होता.

या पुस्तकाची पुनर्मुद्रित आवृत्ती, रा.स्व.संघाचे मुखपत्र मुंबई तरुण भारतने २०२० मध्ये प्रसिद्ध केला. नुकतेच प्रकाशन झाले, ते याच आवृतीच्या कोकणी अनुवादाचे. यात प्रत्येक ओळीचा अनुवाद झाला असल्याने नवीन असा काही आशय पुढे आलेला नाही. या लेखात पुढे पान, संदर्भ आले तर ते मराठी आवृतीचे असतील. पुस्तकातील प्रकरण दुसरे व तिसरे यांच्यात एक पान टाकले आहे, त्यावर सावकरांचे एक विधान प्रकाशित केले आहे. हे विधान व ३-या प्रकणातील पान क्र. १८४ वर आश्रमाचा श्रीधर नामक बटूचा उल्लेख असलेला, असे दोन संदर्भ मला या पुस्तकाचा आत्मा वाटतात.

वीर सावरकरांचे विधान, ‘खरे म्हटले तर गोमंतकासारख्या प्रांतात जे केवळ ह्या ‘विटाळा’च्या भोळसट समजुतीपायी आम्ही आमच्यांतून हाकलून दिले, त्यांच्यासारख्या स्वजनांस परत पितृगेही घेतांना त्यांस शुद्ध करण्याची इतकी आवश्यकता नाही की, जितकी, ज्या आम्ही त्यांना बळेबळें बहिष्कृत करून आंत येऊ दिले नाही, त्या आम्हांस आमच्या ज्ञातिविघातक अरेरावी क्रौर्यासाठी प्रायश्चित्त आहे! शुद्धी बहिष्कृतांची नाही, तर अशा निरपराधी स्वजनांना बहिष्कृत करणाऱ्या आम्हा बहिष्कारकर्त्यांचीच केली पाहिजे!’ असे आहे. मसूर आश्रमातील अल्पायुष्यी श्रीधर नामक बटूला या छोट्याशा उल्लेखातून संपूर्ण शुद्धीकरण विधीचे श्रेय दिले आहे. शुद्धीकरण केलेल्या गावडा समाजाचे त्यावेळचे परिस्थितीजन्य वर्णन सविस्तरपणे या पुस्तकात आहे.

तसेच, त्या वेळच्या प्रतिष्ठित गोमंतकीयांनी लिहिलेल्या लेखात, या समाजावर प्रतिकूल परिस्थितीतही आपली ओळख जपल्याबद्दल, तोंड भरून कौतुके केले आहे. आपले आदिवासी मित्र गोविंद शिरोडकर म्हणतात, की गावडा समाज आदिवासी असल्याने, शुद्धीकरणाचा विधी अकारण होता, वीर सावरकर म्हणतात, ‘आम्ही आमच्यांतून हाकलून दिले, त्यांच्यासारख्या स्वजनांस परत पितृगेही घेतांना त्यांस शुद्ध करण्याची इतकी आवश्यकता नाहीं!’ या शुद्धीकरण इतिहासाच्या प्रथम आवृत्तीवरून शुद्धीकरण झालेल्या समाजातील एक साहित्यिक, सुनील हरी पालकर यांनी,‘गोंयचे आदिवासी: बाटाबाटी आणी शुद्धीकरण’ या नावाचे कोकणी पुस्तक प्रकाशित केले आहे व त्यात या शुद्धीकरण घटनेचे आदराने वर्णन केले आहे.

पुस्तकात आहे, ते कुणीही वाचू शकतो, पण या सर्व पुस्तकांमध्ये काही महत्वाचे दुवे दुर्लक्षित राहिले आहेत, त्यामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रीयेविषयी व योग्यतेविषयी आजही स्पष्टता येत नाही. हे दुर्लक्षित दुवे असे आहेत: आदिवासी गावड्याला गावकरीतून प्राप्त हक्काची जमीन असते, मग हा समाज भूमीहीन कसा वा कधी झाला? तो ‘भट -बामण-पाद्री’ यांच्या शेती बागायतीत कामगार म्हणून कधी पोहोचला? त्या काळात ‘हिंदू’, ‘कोकणे गावडे’, ‘बाटके गावडे’ व ख्रिश्चन गावडे’ यात कोणते फरक होते?

गावडा समाजाला आदिवासी दर्जा मिळाल्यापासून बिगर आदिवासी लोक ‘गावडा’ शब्द वापरताना चारदा विचार करतात, त्यामुळे बिगर आदिवासी समाजाला ‘कोण- व कुठला गावडा’ हे जाणून घेण्यात रस राहिलेला नाही. आदिवासी लोकाना अंतर्गत भेद माहीत आहे, रोटी- बेटी व्यवहारात अजून फरक ठेवला जातो, तरी संविधानिक हक्कांसाठी सर्वजण एकत्र येतात. जबरदस्तीचे धर्मांतर व ‘विटाळा’च्या भोळसट समजुतीने आपल्याच लोकांनी बहिष्कृत केलेले लोक, संविधानातील आदिवासी हक्क तरतुदींमुळे आज तब्बल ५०० वर्षानंतर एकत्र आले आहेत, ज्याची अपेक्षा सावरकरांनी आपल्या प्रस्तावनेत केली आहे. शुद्धीकरण केलेल्या समाजाला त्यावेळी ख्रिश्चन गावडा म्हणायचे ते धर्मांतरामुळे नव्हे, तर त्यांना सक्तीने लावाव्या लागणाऱ्या ख्रिश्चन नावामुळे.

या लोकांची प्रचलित समजुतीनुसार बाटाबाटी झाली नव्हती, कारण हे सगळे लोक मुळात नव्या काबिजादीतले. सासष्टी वा बार्देश येथे झालेल्या बाटबाटीत या लोकांचे कुणी नातेवाईक असले तर यांनाही त्यांच्याच समाजाने वाळीत टाकले, गावकरी हक्काच्या जानिनीवर त्यांना त्यांचा हक्क नाकारला गेला, परिणामस्वरूप त्यांनी स्वत:चा गाव सोडला व दुसऱ्या गावातील बिगर आदिवासी जमीनदाराकडे ‘मुंडकार-कुळ’ म्हणून पिढ्यान्पिढ्या राहिला, एका गावातून पुढच्या गावात, असे करत तिसवाडीला पोहोचला. येथे बिगर ख्रिस्ती कामगारांसाठी लागणारा ‘शेंडी’ कर चुकविण्यासाठी येथील आधी उल्लेख केलेल्या सर्वच जमीनदारांनी, या लोकांना ख्रिस्ती नावे दिली, पोर्तुगीजांना संशय येऊ नये म्हणून या लोकांना घरांपुढे तुळशी वृंदावन उभारण्यास मनाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement: 23 वर्षांचा प्रवास, असंख्य जागतिक रेकॉर्ड! ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती; कोट्यवधी चाहत्यांचे पाणावले डोळे VIDEO

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर 2.57 की 3? आठव्या वेतन आयोगात पगार किती वाढणार? थकबाकीचं संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Crime: दोन्ही हातांत कोयते घेऊन दहशत; कुटुंबीय, ग्रामस्थ आणि पोलिसांना धमकावणारा तरुण ताब्यात

Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

SCROLL FOR NEXT