IND vs NZ 2nd Test Playing 11: प्रसिद्ध- सुंदर OUT, सिराज-जडेजा IN? दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11मध्ये होणार 3 मोठे बदल

India vs New Zealand 2nd Test Playing 11: पहिल्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या डावात केवळ एक आणि दुसऱ्या डावात दोन बळी घेतले होते. त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे पुनरागमन होऊ शकते.
India vs New Zealand 2nd Test Playing 11
Team IndiaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India vs New Zealand 2nd Test Playing 11: भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे सुरु होत आहे. वेलिंग्टनमध्ये रंगलेला पहिला सामना ड्रॉ राहिला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना वगळून विजय मिळवण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर प्लेइंग 11 मध्ये मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

पहिल्या कसोटीत प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या डावात केवळ एक आणि दुसऱ्या डावात दोन बळी घेतले होते. त्याच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे पुनरागमन होऊ शकते. पहिल्या सामन्यात सिराजला संधी न दिल्याने चर्चांना उधाण आले होते. तसेच, आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या रवींद्र जडेजाऐवजी (Ravindra Jadeja) वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती.

India vs New Zealand 2nd Test Playing 11
IND vs NZ 2nd Test: क्राइस्टचर्चची वाट सोपी नाही! जुना पराभव अन् हॅगली ओव्हलचा रेकॉर्ड वाढवतोय टीम इंडियाची धाकधूक; गिल सेनेपुढे खडतर आव्हान

मात्र, सुंदरला केवळ एक बळी आणि 24 धावा करता आल्याने त्याच्या जागी जडेजाचा समावेश होण्याची शक्यता आहे. आकाश दीपने पहिल्या डावात 3 बळी घेतले, पण दुसऱ्या डावात त्याला संघर्ष करावा लागला. सराव सत्रात गुरनूर ब्रार कसून सराव करत असून फलंदाजीचाही सराव करत असल्याने आकाशऐवजी त्याला संधी मिळू शकते. दोन्ही देशांच्या वेळेतील फरकामुळे भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. प्रेक्षकांना हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि सोनी लिव्ह ॲपवर थेट पाहता येईल.

India vs New Zealand 2nd Test Playing 11
IND vs NZ: विक्रमांची बरसात! टीम इंडियाने एकाच डावात रचले तब्बल 5 विश्वविक्रम; फलंदाजांनी गाजवले वेलिंग्टनचे मैदान

भारताची संभाव्य प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.