Gangaram Gavankar Death Dainik Gomantak
मनरिजवण

Gangaram Gavankar Passed Away: वस्त्रहरणकार हरपले! जगभर मालवणी भाषा पोचवणारे ज्येष्ठ लेखक 'गंगाराम गवाणकर' यांचे निधन

Gangaram Gavankar Death: मालवणी भाषेला जगाच्या पटलावर आणणारे जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.

Sameer Panditrao

मुंबई: मालवणी भाषेला जगाच्या पटलावर आणणारे जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे २७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. दहिसर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गंगाराम गवाणकर यांचा जन्म १ जून १९३९ साली झाला होता. ‘वस्त्रहरण’सोबत गंगाराम गवाणकर यांनी वीसेक नाटके लिहिली होती. गंगाराम गवाणकर यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर तालुक्यातील माडबन तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले.

वेडी माणसे, दोघी, वस्त्रहरण, प्रीतीगंध, चित्रागंदा, वन रूम किचन, वात्रट मेले, वर भेटू नका, पोलिस तपास चालू आहे, वर परीक्षा, अरे बाप रे, महानायक, वडाची साल पिंपळाक, भोळा डांबिस, मेलो डोळो मारून गेलो त्यांच्या या नाटकांनी मराठी रंगभूमीवर राज्य केले.

वस्त्रहरण या नाटकाचे देशभरात ५ हजारांपेक्षा जास्त प्रयोग, वात्रट मेले या नाटकाचे २५०० प्रयोग आणि वन रूम किचन या नाटकानेही दमदार मजल मारली. गवाणकर १९७२ पासून आकाशवाणी व दूरदर्शनवर अनेक सदरातून, दूरदर्शन मालिका आणि मराठी चित्रपटांचे लेखन करत होते. १९८४ मध्ये वस्त्रहरण या मालवणी नाटकाचे रंगभूमीवर पदार्पण झाले आणि मालवणी बोली सातासमुद्रापर पोहचली.

‘व्हाया वस्त्रहरण’ हे गंगाराम गवाणकर यांचे आत्मकथन आहे. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामानेही भारत रंगमहोत्सवात ‘वस्त्रहरण’ला खास निमंत्रित केले. गंगाराम गवाणकर हे ९६व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षपद राहिले होते. २०२३ मध्ये त्यांना मालिका नाटक चित्रपट' अर्थात मानाचि लेखक संघटनेचा पुरस्कार मिळाला होता.

गव्हाणकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (28 ऑक्टोबर) दहिसरच्या अंबावाडी, दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी 9:30 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

41,663 रुपये दारुवर उडवले, बाकी गोवा ट्रीपचा खर्च फक्त 32 हजार; तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ Watch

SCROLL FOR NEXT