41,663 रुपये दारुवर उडवले, बाकी गोवा ट्रीपचा खर्च फक्त 32 हजार; तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ Watch

Goa trip viral video: चारजणांनी निव्वळ दारुसाठी तब्बल ४१,६३३ रुपये खर्च केले आहेत. विमानतळावर असणाऱ्या या तरुणांनी दारुचे बिल शेअर केले आहे.
Viral Goa Trip Video – 4 Friends Spends ₹41,663 on Alcohol, ₹32,000 on Trip | Watch Now
Goa trip viral videoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काही दिवस का होईना पण, गोवा फिरुन यायला हवं, अशी देशातील प्रत्येकाची भावना असते. गोव्यातील शांत समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, नाईट लाईफ, कॅसिनो, क्रूझ, बोटींग, वॉटर स्पोर्ट्स येथील संस्कृती आणि हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास अशा अनेक गोष्टींचे आकर्षण देशी - विदेशी पर्यटकांना असते.

गोव्याबाबत आणखी एक आकर्षण असते ते म्हणजे स्वस्त मिळणारी दारु. एक दिवासाची गोवा ट्रीप निव्वळ दारु पिण्यासाठी करावी अशीही इच्छा व्यक्त करणारे महाभाग आहेत. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत चार मित्र गोव्यात फिरुन झाल्यानंतर माघारी निघाले आहेत. गोवा विमानतळावर असताना त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. चारजणांना गोव्यात फिरण्यासाठी ३२,००० रुपये खर्च आला.

त्यात प्रत्येकी ८,००० रुपये त्यांच्या वाट्याला आले. दर, विमानाचं तिकीट वैगेरे खर्च धरुन हा आकडा प्रत्येकी १२,००० रुपये झाला. याचाच अर्थ सर्वांना गोव्यात येणं - जाणं (फ्लाईटने), राहणं, खाणं आणि फिरणं यासाठी १२,००० खर्च झाले.

Viral Goa Trip Video – 4 Friends Spends ₹41,663 on Alcohol, ₹32,000 on Trip | Watch Now
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

दारुवर खर्च केले ४१,६६३ रुपये

चारजणांनी निव्वळ दारुसाठी तब्बल ४१,६३३ रुपये खर्च केले आहेत. विमानतळावर असणाऱ्या या तरुणांनी दारुचे बिल शेअर केले आहे. चौघांना गोव्यात फिरण्यासाठी आला त्यापेक्षा अधिक खर्च त्यांनी दारुवर केल्याचे यातून दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, हा खर्च त्यांना किती दिवसांसाठी आला याबाबत उल्लेख करण्यात आलेला नाही.

Viral Goa Trip Video – 4 Friends Spends ₹41,663 on Alcohol, ₹32,000 on Trip | Watch Now
पंढरपूरच्या ‘बाबा’चा बेळगावात 2 कोटींचा घपला; घरबसल्या अगरबत्ती उद्योगाच्या नावाखाली 8,000 महिलांना गंडवले

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर विविध कमेंट केल्या आहेत. ही गोवा नव्हे तर दारु ट्रीप असल्याची एक कमेंट नेटकऱ्याने केली आहे. काही जणांनी या गोष्टीचा निषेध केला आहे.

हा चुकीचा प्रकार असून, अनेक तरुण दारुवर जास्त पैसे खर्च करत असल्याचे मत व्यक्त केले आहे. काही जणांनी त्यांना गोवा ट्रीपमध्ये दारुवर आलेल्या खर्चाचा हिशोब कमेंटमध्ये दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com